Posted by वृत्तभारती
Friday, February 2nd, 2024
– ठाकरे, पवारांची एक दोन जागांवर होणार बोळवण, मुंबई, (०२ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीच्या या पृष्ठभूमीवर महाविकास आघाडीच्या जागवाटपासंदर्भातला फार्म्युला आता चर्चेत आला आहे. विदर्भात सर्वाधिक जागा कंग्रेस स्वतःच लढेल आणि ठाकरे, पवारांची एक दोन जागांवर बोळवण होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. पूर्व विदर्भात सहा लोकसभा मतदार संघ आहेत. यातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि रामटेक या पाच मतदारसंघावर काँग्रेस निवडणूक लढण्याची शक्यता आहे. भंडारा-गोंदिया हा मतदारसंघ परंपरेने राष्ट्रवादी...
2 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 20th, 2023
– देशांतर्गत प्रवास करणारे १४ लाख ८० हजार, सहामाहीच्या तुलनेत ४१ टक्क्यांहून अधिक वाढ, नागपूर, (२० नोव्हेंबर) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करणार्या हवाई प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. देशांतर्गत हवाई प्रवाशांची संख्या २०२२ मध्ये १०,६१,१३४ वरून २०२३ मध्ये १४,८०, २६१ वर गेली आहे. याशिवाय २०२२ मध्ये परदेशी प्रवाशांची संख्यादेखील १९ हजार होती. तर २०२३ मध्ये हीच आकडेवारी ४५ हजारावर गेली आहे. नागपूर विमानतळावरून प्रवास करणार्या...
20 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
– केंद्रीय संचार ब्युरो आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन, नागपूर, (०१ नोव्हेंबर) – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय —सीबीसी, नागपूर आणि रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित ’सरदार पटेल – राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार’ दोन दिवसीय मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे २ आणि ३ नोव्हेंबर रोजी रामटेक येथील विद्यापीठ...
2 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, October 26th, 2023
– परभणीत सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, – निवडणूक रद्द होण्याची नामुष्की, परभणी, (२५ ऑक्टोबर) – ग्रामपंचायत निवडणुकीला मराठा आरक्षणाचा फटका बसताना दिसत आहे. परभणीतील वझुर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आणि संरपंचपदासाठी दाखल आलेले अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे या गावची निवडणूक रद्द होण्याच्या मार्गावर आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील वझुर येथील ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सरपंच आणि ११ ग्राम पंचायत सदस्य अशा १२ जागांसाठी या निवडणुकीत एकूण ३४ उमेदवारी अर्ज दाखल...
26 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, October 15th, 2023
नागपूर, (१५ ऑक्टोबर) – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला आज धमकीचे पत्र मिळाले आहे. दोन न्यायमूर्तींनी मालमत्ता कर प्रकरणात प्रतिकूल निकाल दिल्यास त्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. एका अधिकार्याने सांगितले की, नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. नागपूर खंडपीठाला ११ ऑक्टोबर रोजी हे पत्र प्राप्त झाले असून वरुड नगरपरिषदेच्या मालमत्ता करवाढीला आव्हान देणार्या प्रभाकर काळे यांच्या याचिकेवर दोन न्यायमूर्तींनी प्रतिकूल निकाल...
15 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, September 23rd, 2023
– अनेक वस्त्या जलमय, रेल्वे स्थानकातही घुसले पाणी, नागपूर, (२३ सप्टेंबर) – शुक्रवारी मध्यरात्रीनंतर नागपुरात अतिमुसळधार पाऊस पडला. ढगफुटी झाल्याने आणि दोन तासांत ‘अति’रेकी पाऊस पडल्याने शहरातील असंख्य वस्त्या जलमय झाल्या. विविध नगरे आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने शहरात जनजीवन विस्कळीत झाले. शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने लष्कराला मैदानात उतरावे लागले, त्याचप्रमाणे एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे जवानही पहाटेपासूनच मदतकार्य करीत होते. जलमय भागांमधून नागरिकांना बोटींमधून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने...
23 Sep 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, August 6th, 2023
-महत्वाचे शहर मेट्रोने जुळणार, -गोधणीच्या पुनर्विकासाचा ग्रामीण जनतेला लाभ, -केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते प्रकल्पाचा प्रारंभ, नागपूर, (०६ ऑगस्ट) – मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकावरुन अमरावती,बडनेरा, भंडारा, गोंदिया, वर्धा, नरखेड, काटोल,वडसा आदी ठिकाणांसाठी मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांना यापूर्वीच दिला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने आगामी काळात नागपूर येथून विदर्भातील महत्वाचे शहर जोडल्या जाणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी...
6 Aug 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, July 11th, 2023
– भाजपाचे उद्धव ठाकरे यांना आव्हान, – व्हेरायटी चौकात निषेध आंदोलन, – प्रतिकात्मक अंत्ययात्रा व पुतळा दहन, नागपूर, (११ जुलै) – शहरात सोमवारी आयोजित उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अश्लाघ्य टीका केली. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात आज व्हेरायटी चौकात महानगर भाजपातर्फे हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आले. आपल्या वक्तव्यावर ठाकरे यांनी माफी मागावी, अन्यथा नागपुरात फिरु देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलना...
11 Jul 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, June 11th, 2023
-पाण्याचा पिण्यासाठी व सिंचनासाठी उपयोग, -केंद्रीय मंत्री गडकरींच्या प्रेरणेतून प्रकल्प, अमरावती, (१० जून) – पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यांत पूर्णा नदीच्या गाळाचा प्रदेश आहे. ज्यापैकी जवळपास तीन हजार चौ. किमी क्षेत्रांत खार्या पाण्याची समस्या आहे. या समस्येवर मात करून शेतकर्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी गोडे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथे साकारल्या जात असलेल्या गोड पाण्याच्या प्रायोगिक प्रकल्पाची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...
11 Jun 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, March 4th, 2023
– डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, नागपूर, (४ मार्च) – ‘वार’ यंत्राची निर्मिती वैदिक खगोलशास्त्राच्या आधारे असून, भारतामध्ये जंतरमंतर, जयपूर येथे राजा जयसिंग यांनी कालगणनेची जी अचूक वेधशाळा निर्माण केली आहे, त्यानंतरच्या काळात अशा वेधशाळांची उभारणी भारतात फारशी झाली नाही. त्यामुळे भारतीय खगोल विज्ञानाचे संशोधन देश-विदेशात पोहोचविण्याची गरज लक्षात घेता असे उपक्रम आवश्यक असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. आर्यभट्ट अॅस्ट्रॉनॉमी पार्क, श्री क्षेत्र चक‘वर्ती नगरी चौकी, कान्होलीबारा...
4 Mar 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 23rd, 2023
सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वॉटर ईज लाईफ सोसायटीचा सत्कार, चंद्रपूर, (२३ फेब्रुवारी ) – गेल्या १२ वर्षापासून अविरतपणे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांची तृष्णातृप्ती करण्याचे काम महत्कार्य करणार्या वॉटर ईज लाईफ सोसायटीचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष सत्कार केला. दुष्काळात टँकर लावून जंगलातील पाणवठे भरण्यापासून, तर सौर उर्जेचा वापर करून स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणवठे दिवसरात्र भरून ठेवण्याचे काम या संस्थेने केले आणि त्याची विशेष दखल वनमंत्र्यांनी ताडोबाच्या वर्धापनदिन सोहळ्यात घेतली. या संस्थेचे...
23 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 16th, 2023
नागपूर, (१६ फेब्रुवारी ) – पुढील महिन्यात आयोजित होणार्या जी-२० या जागतिक परिषदेसाठी नागपूर शहर सज्ज होत आहे. नागपूर महानगर पालिकेच्यावतीने महत्वाच्या शासकीय संस्थांच्या संरक्षक भिंती, चौकांमध्ये सिंथेटिक पॅच आदी सौंदर्यीकरणाची कामे सुरु आहेत. महत्वाचे शासकीय कार्यालये असणार्या सिव्हिल लाईन्स परिसरात सौदर्यीकरणाचे विविध कामे सुरु आहेत. येथील राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या संरक्षक भींतींवर सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. याच रस्त्याने पुढे जीपीओ चौकात सुंदर व सुबक सिंथेटिक पॅच (२५द६फुट आकाराचे तीन...
16 Feb 2023 / No Comment / Read More »