किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश-महत्वाचे शहर मेट्रोने जुळणार,
-गोधणीच्या पुनर्विकासाचा ग्रामीण जनतेला लाभ,
-केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते प्रकल्पाचा प्रारंभ,
नागपूर, (०६ ऑगस्ट) – मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकावरुन अमरावती,बडनेरा, भंडारा, गोंदिया, वर्धा, नरखेड, काटोल,वडसा आदी ठिकाणांसाठी मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांना यापूर्वीच दिला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने आगामी काळात नागपूर येथून विदर्भातील महत्वाचे शहर जोडल्या जाणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत गोधनी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रवीण दटके, मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक तुषारकांत पांडे आदींची उपस्थिती होती.
२८.९ कोटी खर्चून गोधनीचा विकास
देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे करण्यात आला.अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ४४ तर नागपूर विभागातील १५ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. २८.९ कोटी खर्चून गोधनी रेल्वे स्थानाकाचेही पुर्ननिर्माण होणार आहे. काटोल, नरखेड येथून मोठ्या संख्येने नागरिक नागपूरला रेल्वेने येतात. या गोधणी सारख्या अन्य स्थानकांवर जास्तीत जास्त रेल्वेगाड्यांना थांबा मिळेल तेव्हा ग्रामीण भागातील नागरिकांना शहरातील जनजीवन अनुभवता येईल, असे गडकरी यावेळी म्हणाले
अजनी, गोधनी ही उपस्थानके
मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकानंतर अजनी आणि गोधनी ही दोन उपस्थानके म्हणून नावारुपाला येतील. गोधनी सारख्या भागात रस्ते, पार्किंगची व्यवस्था चांगली व्हावी,याकडेही आपले लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते स्वातंत्र्यसेनानींचा सत्कार करण्यात आला.