किमान तापमान : 23.35° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.35° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– आशिष शेलार यांचा भास्कर जाधवांवर पलटवार,
मुंबई, (०४ ऑगस्ट) – देशाच्या निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना कोणती, हे स्पष्ट केले असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे असा कोणताही पक्ष नोंदणीकृत नाही. शिवाय, विधानसभा अध्यक्षांनी या सभागृहात त्यांना मान्यताही दिलेली नाही. उबाठाचे या सभागृहात अस्तित्वच नसल्याने यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रश्नही उद्भवत नाही, अशा शब्दांत भाजपा नेते आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांच्यावर पर्यायाने ठाकरेंवर पलटवार केला.
महाराष्ट्र माथाडी व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे पाठविण्याचा प्रस्ताव विधानसभेत सादर झाला. प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तो विधानसभाध्यक्षांनी सभागृहात वाचून दाखविल्यानंतर उबाठा गटाचे सदस्य भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत, विधिमंडळाच्या समित्या २५, २१ तर काही १७ सदस्यीय असतात. त्या समित्यांमध्ये सत्ताधारी सदस्यांचे किती सदस्य घ्यावेत, विरोधी पक्षाचे किती असावेत याचे धोरण आणि स्वरूप ठरलेले आहे. त्यानुसार समितीत आमचा एकही सदस्य नाही, असे ते म्हणाले.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी गेल्या ३२ वर्षांपासून या सभागृहाचा सदस्य आहे. माझ्या अनुभवानुसार समिती गठित करीत असताना, संख्याबळाच्या प्रमाणात सदस्य घेतले जातात. आता भाजपाचे १०६ आणि सहकारी ९ आहेत. २०, २२ सदस्यांमागे एक अशा प्रमाणात सदस्य समितीत सामावून घेण्यात आले आहेत. त्याचनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य घेण्यात आले आहे. राहिला प्रश्न उबाठाच्या सदस्याचा समावेश नसल्याचा तर, वरच्या सभागृहाचे सचिन अहिर या समितीत आहेत.
त्यानंतर शेलार यांनी आपले मत मांडले. एकतर उबाठा असा कोणताही नोंदणीकृत पक्ष नाही. या सभागृहात त्यांची पक्ष म्हणून स्वतंत्र नोंदणी नाही. यांचे कोणतेही वैधानिक अस्तित्व नाही. एकीकडे आम्हीच शिवसेना म्हणतात, मग त्याच शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक आलेले सदस्य या समितीत असताना, आमचा सदस्य समितीत नाही, असे म्हणणे बौद्धिक दिवाळखोरीच लक्षण असल्याचे ते म्हणाले.