किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– अजित पवारांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ,
मुंबई, (०४ ऑगस्ट) – काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेतेपद कोणी घ्यायला तयार नाही. वडेट्टीवारांना दोन-दोन वेळा दिले जाते. लढायच्या वेळेस तुम्ही आणि चांगले दिवस आले की, आम्ही आहोतच… अशा शब्दांत काँग्रेस नेत्यांचा समाचार घेताना, माफ करा माझा टोमणे मारण्याचा स्वभाव नाही, असे अजित पवारांनी म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर पवार बोलत होते. विरोधी पक्ष नेतेपदी कोण विराजमान होईल, अशा चर्चा सुरू होत्या. यात विजय वडेट्टीवार यांचे दुसर्यांदा नाव समोर आले. पण, आम्हाला वाटले की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पद घेत नाहीत, विधिमंडळाचे प्रमुख बाळासाहेब थोरात होतील, असे वाटत होते. पण, थोरातांनीही हे पद घेतले नाही. जे लढायचे ते तुम्ही लढा. पुन्हा चांगले दिवस आले तर, आम्ही आहोत. अशा पद्धतीचा काहींचा स्वभाव असतो, असे अजित पवारांनी म्हटल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. अजित पवार म्हणाले, मी कुणाचे नाव घेत नाही. बाळासाहेब आणि चव्हाणांनी हे सोडून द्यावे, माझा टोमणे मारण्याचा स्वभाव नाही, असे वक्तव्य करताच, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरातांसह सर्व सभागृह खदखदून हसू लागले.