किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– भाजपाचे उद्धव ठाकरे यांना आव्हान,
– व्हेरायटी चौकात निषेध आंदोलन,
– प्रतिकात्मक अंत्ययात्रा व पुतळा दहन,
नागपूर, (११ जुलै) – शहरात सोमवारी आयोजित उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अश्लाघ्य टीका केली. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात आज व्हेरायटी चौकात महानगर भाजपातर्फे हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आले. आपल्या वक्तव्यावर ठाकरे यांनी माफी मागावी, अन्यथा नागपुरात फिरु देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी उद्धव ठाकरे,अडीच वर्ष सत्तेत होते, पण त्यांना अर्धा दिवस सुद्धा विदर्भात यायला वेळ नव्हता, आणि आता अचानक विदर्भाचा पुळका आला आणि नागपूरमध्ये येऊन विकासपुरुषाला दुषणे दिलीत, हा प‘कार भाजपा सहन करणार नाही असे सांगितले. उद्धव ठाकरे स्वत: कलंकित आहेत ज्यांनी स्वतःच्या वडिलांच्या विचारांना तिलांजली दिली. हिंदुत्वाला तिलांजली दिली असे मत माजी महापौर व उपमु‘यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी व्यक्त केले.
या सभेत माजी खासदार डॉ. विकास महात्मे, महिला आघाडीच्या अश्विनी जिचकार, माजी महापौर नंदा जिचकार, नगरसेवक धर्मपाल मेश्राम यांनीही मार्गदर्शन केले. आंदोलनात माजी आमदार मिलिंद माने, प्रदेश मंत्री धर्मपाल मेश्राम, प्रदेश मंत्री अर्चना डेहनकर, शहर महामंत्री रामभाऊ आंबूलकर, संजय बंगाले, शहर संघटनमंत्री विष्णू चांगदे, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी- वखरे, प्रदेश महिला मोर्चा महामंत्री अश्विनी जिचकार, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष अरविंद गजभिये, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र पटले, आदर्श पटले, वर्षा ठाकरे, मनिषा कोठे, मनिषा काशीकर, परिणीता फुके, सोनाली कडु, प‘वी शामकुळे, मिनाक्षी तेलगोटे, जोत्सना कुर्हेकर, दिपांशु लिंगायत, सचिन करारे, कल्याण देशपांडे तसेच शहराचे व मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सभेच्या समारोपप्रसंगी कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक प्रेतयात्रा आणि पुतळ्याचे दहन केले.