किमान तापमान : 23.35° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.35° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलअमरावती, (१० जुलै) – मुख्यमंत्री होण्याची पण माझी इच्छा नव्हती पण, स्थितीच अशी निर्माण झाली की ते स्विकारावे लागले. पुढे कोणतेही पद न स्विकारण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण उबाठा शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. अमरावती दौर्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी माध्यमांशी संवाद साधला. शहरात त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरवर भावी पंतप्रधान असा उल्लेख असल्याने त्यांना उपरोक्त प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी खा. अरविंद सावंत, माजी खा. अनंत गुढे व अन्य नेते हजर होते.
एकत्र येणारे विरोधक नव्हे देशप्रेमी
केंद्रातल्या भाजपा सरकार विरोधात नितीश कुमार, ममता बॅनर्जी, शरद पवार, राहुल गांधी आणि आम्ही एकत्र जरी येत असलो तरी आम्हाला विरोधक म्हणणे योग्य नाही तर हे सारे देशप्रेमी आहेत. मोठा लढा उभारून मिळालेल्या स्वातंत्र्याचा र्हास होणार नाही, यासाठी देशभरातील देशप्रेमी एकत्र येत आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा सहभाग घ्यायला हवा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
’राईट टू रिकॉल’ची मागणी
आता खोक्यांच्या बळावर दमदाटी करून कोणीही पंतप्रधान होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. या संपूर्ण परिस्थितीबाबत मी अनेकदा विचार केला. खरंतर फार पूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशात ’राईट टू रिकॉल’ असावा अशी मागणी केली होती. ’राईट टू रिकॉल’ची मागणी ही अतिशय योग्य असल्याचे आजची परिस्थिती पाहून जाणवते असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
पक्ष आता चोरले जातात
आता पावसाळा संपल्यावर देशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ज्या काही घडामोडी घडल्या, त्यामध्ये शिवसेनेवर खर्या अर्थाने प्रेम करणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. त्यांना भेटण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्राच्या दौर्यावर निघालो आहे. फार पूर्वीपासून पक्ष फोडण्याचे राजकारण राज्यात आणि देशात सुरू आहे. आता मात्र थेट पक्ष चोरला जातो आहे, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
राणांबाबत भाष्य करण्यास टाळले
राणा दाम्पत्याच्या कार्याकर्त्यांनी फाडलेल्या पोस्टर संदर्भात उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी कुठलेही भाष्य केले नाही. अमरावतीत अनेक वर्षांपासून शिवसेनेचा खासदार निवडून येतो आहे. मागच्या निवडणुकीमुळे काही गडबड झाली आणि शिवसेनेचा पराभव झाला. मात्र जे कोणी निवडून आले ते फार काळ टिकणार नाहीत, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.