किमान तापमान : 23.21° से.
कमाल तापमान : 23.65° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.04 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.21° से.
22.99°से. - 26.39°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल-छगन भुजबळ यांचा चिमटा,
अहमदनगर, (१० जुलै) – पावसात आम्हीही भिजतो, पण साहेबांचे वय झाले आहे, आजारपण आहे. त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळते, असा चिमटा छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना काढला. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार मैदानात उतरले. त्यांनी राज्यव्यापी दौर्याची घोषणा केली. या दौर्यातील पहिली सभा भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात पार पडली. यावेळी शरद पवार यांचे पावसात भिजलेले एक छायाचित्र व्हायरल झाले. त्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिवसेनेत असताना आम्हीसुद्धा पहाटेपर्यंत काम करायचो. मागच्या निवडणुकीत प्रचंड पावसात आम्ही बैठका घेतल्या. हा नवीन प्रकार नाही, असे भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ नाशिक येथून पुण्याला निघाले होते. जुन्नर येथील आमदार अतुल बेनके यांची समजूत काढण्यासाठी ते चालले होते. यावेळी त्यांचे संगमनेरमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. भाजपाने राकाँ फोडल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. यावर बोलताना भाजपाचे मुंडे कुटुंब याच लोकांनी फोडले होते. धनंजय मुंडेंना तुम्हीच दूर केले होते, असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
पुतण्याने सांगितल्यावर थांबेल
माझा पुतण्या सांगेल, तेव्हा मी थांबेल, अशा शब्दांत पुण्यात पोहोचल्यावर छगन भुजबळ यांनी शरद पवारांना डिवचले. काका शरद पवारांना पुतण्या अजित पवार थांबण्याचा सल्ला वारंवार देत होते. मात्र, थे थांबले नाहीत, असे ते म्हणाले. आता तुमचे वय झाले असे अनेकजण म्हणतात, मग तुम्ही 2024 ची विधानसभा निवडणूक लढणार का, या प्रश्नात भुजबळ म्हणाले, माझ्या पुतण्याने मला थांबायला सांगितले तर, मी नक्की थांबेल, असे उपरोधिक उत्तर त्यांनी दिले.