किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनागपूर, (०९ जुलै) – विधानसभेत एक कविता म्हटली होती ‘मी पुन्हा येईल.’ ज्यावेळेस म्हटली तेव्हा माहिती नव्हते की हिची अडचण होईल. म्हटली त्या वेळेस लोकांनी डोक्यावर घेतली. आठ दिवसात १० भाषेत अनुवाद करून टाकले. त्यानंतर राज्य आले नाही. त्या कवितेमुळेच राज्य गेलं, असे अनेकांनी सांगितले. शेवटी मला हे सांगावं लागलं की, ‘पुन्हा येईन म्हटलं होतं, ते मीपण आलो, इतरांनाही सोबत घेऊन आणलं, परवा आणखी एकाला सोबत आणलं’. हे सांगितलं ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांनी हे सांगताच सभागृहात हशा पिकला.
भारतीय जनता पार्टीचे विदर्भ संघटक डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या ‘दिक्कालाच्या मांडवात’ हा नवा काव्यसंग्रह व ‘काठावर दूर नदीच्या’ या काव्यसंग्रहाच्या दुसर्या आवृत्तीचे, सांजरंग व राष्ट्ररंग या काव्य ध्वनिफितींचे तसेच डॉ. मनीषा कोठेकर यांच्या ‘उंबरठ्यापल्याड’ पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भारतीय स्त्री शक्तीच्या संस्थापक अध्यक्ष उर्मिला आपटे, लेखक व कवी श्याम धोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झाले. नागपूरसह संपूर्ण विदर्भातून लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची भरगच्च उपस्थिती होती.
डॉ. उपेंद्र कोठेकर हे सिद्धहस्त कवी आहेत. वेगवेगळ्या प्रकारची अभिव्यक्ती ते चांगल्याप्रकारे मांडत असतात. त्यांच्यात कृष्णभक्ती पहायला मिळते. समाजातील लालसेवरसुद्धा त्यांनी अतिशय सुंदर लेखन केले आहे. पांडुरंगाच्या चरणी लीन होणारे काव्यही त्यांनी तयार केले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, साधारणतः कविता म्हटली की जंगल, झाडांच्या गर्दीत शब्द स्फुरतात. उपेंद्रजींच्या कविता या माणसांच्या गर्दीत स्फुरलेल्या आहेत. श्याम धोंड यांनी कवितांची थोरवी व ताकद यावर प्रकाश टाकला. उर्मिला आपटे यांनी कोठेकर दांपत्याच्या जीवनावर प्रकाश टाकला. सर्वच वक्त्यांनी कोठेकर दांपत्याच्या काव्य व लेखन प्रतिभेवर अभ्यासू भाष्य केले.