किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– अटलजींच्या कवितेतून काकाने पुतण्याला सुनावले,
नाशिक, (०८ जुलै) – ‘तुम्ही कधी तरी थांबणार आहात का?’ या अजित पवार यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. मी आजही धडधाकट असून, पक्ष सांभाळण्यास सक्षम आहे. जीवात जीव आहे, तोपर्यंत पक्षाला जनमानसात नेणार आहे. ‘ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ, मै फायर हूँ’ या दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेद्वारे शरद पवार यांनी अजित पवारांचा समाचार घेतला.
येवला येथे आयोजित सभेसाठी शरद पवार नाशिक जिल्ह्यात आले होते. सभेपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वयाबाबत टीका करणार्यांना त्यांनी पुन्हा एकदा ठणकावले. माझी तब्येत ठणठणीत असून पक्ष पुढे चालविण्यासाठी जोमाने काम करीत राहणार आहे. प्रेम करणारी माणसे जवळपास आहेत, तोपर्यंत हा पक्ष पुढे नेण्यासाठी काम करणार आहे, असे पवार म्हणाले. मला कुणावरही टीका करायची नाही. मात्र, पक्षातून बाहेर पडलेल्या सर्व बंडखोर आमदारांचा पराभव होणार आहे. प्रफुल्ल पटेल यांना दहा वर्षे मंत्रिपद दिले, लोकसभेत पराभव होऊनही राज्यसभेत पाठवले. अनेकदा लोक म्हणायचे, सुप्रिया सुळेवर तुम्ही अन्याय केला. सुप्रियांनी पक्षीय राजकारणात यावे, असा कार्यकर्त्यांचा आग‘ह होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळविला, असे शरद पवार म्हणाले.
आमदारांचा आकडा महत्त्वाचा नाही
माझ्यासोबत किती आमदार आहे, हा आकडा महत्त्वाचा नाही. २३ राज्याचे पदाधिकारी आमच्यासोबत असून, ते कार्यकारिणी बैठकीत होते. लोकशाही टिकवायची असेल तर, विरोधी पक्ष राहायलाच हवे. मात्र, भाजपा विरोधी पक्षांनाच संपवत आहे, असे सांगताना, अजित पवार गटाला फेरविचार करण्याचा सल्ला डहरअॅरव झरुरअॅ शरद पवारांनी दिला.
होय, भाजपासोबत चर्चा झाली होती
२०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर भाजपासोबत चर्चा झाली होती. मात्र, विचारधारा वेगळी असल्याने ती पुढे सरकू शकली नाही. आपण शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर मग भाजपासोबत का नाही, असे अजित पवार नेहमी म्हणायचे. शिवसेना आणि भाजपात अंतर आहे, असे शरद पवार म्हणाले.