किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादल– काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची टीका,
मुंबई, (०६ जुलै) – राजकारणात मुलीची प्रगती व्हावी यासाठी शरद पवार यांनी अनेक नेत्यांना बाजूला केले, अशी टीका काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांवर केली आहे. राकाँत फूट पडल्यानंतर काँग्रेसकडून आलेले हे पहिले वक्तव्य आहे. याआधी काँग्रेस या घडामोडींसाठी अजित पवार आणि भाजपाला जबाबदार धरत होती.
पक्ष चालवताना शरद पवार यांच्याकडून काही चुका झाल्या असतील त्यामुळे कदाचित इतक्या वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कडवटपणा होता. कदाचित त्यांनी आपल्या मुलीच्या प्रगतीसाठी या लोकांना थोडे दूर केले असेल. मला त्यांच्या कौटुंबिक वादात जायचे नाही. मात्र, हा वाद कौटुंबिक असला तरी, त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार आहे. त्यामुळेच हे विभाजन वास्तविक आणि कडवट असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या फौजिया खान यांनी त्यांच्यावर टीका केली. सीबीआय-ईडीच्या दबावामुळे अशा प्रकारची वक्तव्ये येत आहेत. आम्ही शरद पवार यांचे समर्थन करतो, असे फौजिया खान यांनी सांगितले.
अशोक चव्हाणांवर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
राकाँत फूट पडल्यानंतर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण काही आमदारांसह भाजपात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या शक्यता फेटाळल्या. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसच्या कोअर समितीची बैठक झाली. आम्ही शरद पवार आणि महाविकास आघाडीसोबत लढणार आहोत. काँग्रेसचा कोणताही नेता पक्ष सोडणार नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले.