किमान तापमान : 24.97° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादल– एकनाथ शिंदे यांची माहिती,
मुंबई, (०६ जुलै) – अजित पवार सत्तेत सामील झाल्याने हे सरकार अधिक मजबूत झाले आहे. ते आल्याने शिवसेनेत कुणीही नाराज नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. सरकार पडणार या निव्वळ अफवा असून, माझ्या मागे मोदी-शाह यांची ताकद असल्याचे शिंदे यांनी सांगितले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे शिवसेनेतील आमदार नाराज असल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे यावरून राजीनामा देणार असल्याचेही सांगितले जात होते. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, अजित पवारांनी विकासाला साथ दिली आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सोबत घ्यायचे ठरवले. वर्षभरात झालेला विकास पाहून अजित पवार सोबत आले आहेत.
अजित पवार सोबत आल्याने सरकार मजबूत झाले असून, शिवसेनेत कुणीही नाराज नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या काही बातम्या सातत्याने येत आहेत. त्यावर बुधवारी राज्याचे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केले होते. आज त्यावर खुद्द एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ज्या दिवसापासून या सरकारचा शपथविधी झाला, त्या दिवसापासून सरकार पडणार असल्याच्या अफवा सुरू आहेत. आता तर या अफवांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पाठबळ आहे. त्यामुळे सरकारला काही धोका नाही.
विरोधकांनी आपले जळते घर पाहावे
अजित पवारांच्या शपथविधीनंतर शिवसेना ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाला लक्ष्य केले असून, त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्या टीकेला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, आपल्यावर होणार्या टीकेला काहीही अर्थ नाही. विरोधकांनी पहिले आपल्या जळत्या घराकडे पाहावे, आत्मपरीक्षण करावे. वर्षभरात जे काही चांगले निर्णय घेतले, ते त्यांना बघवत नाही. लोकांना सर्वच माहीत आहे, त्यांना सगळेच कळते.