किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.47°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन,
नागपूर, (४ मार्च) – ‘वार’ यंत्राची निर्मिती वैदिक खगोलशास्त्राच्या आधारे असून, भारतामध्ये जंतरमंतर, जयपूर येथे राजा जयसिंग यांनी कालगणनेची जी अचूक वेधशाळा निर्माण केली आहे, त्यानंतरच्या काळात अशा वेधशाळांची उभारणी भारतात फारशी झाली नाही. त्यामुळे भारतीय खगोल विज्ञानाचे संशोधन देश-विदेशात पोहोचविण्याची गरज लक्षात घेता असे उपक्रम आवश्यक असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
आर्यभट्ट अॅस्ट्रॉनॉमी पार्क, श्री क्षेत्र चक‘वर्ती नगरी चौकी, कान्होलीबारा येथे नवनिर्मित ‘वार’ यंत्राचे उद्घाटन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक कोठा जयपाल रेड्डी, पटियाला येथील बिरविंदर सिंग शम्मी सिद्धू, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, डॉ. दिलीप पेशवे व प्राध्यापकांची चमू उपस्थित होती. याप्रसंगी डॉ. प्रमोद पडोळे व डॉ. दिलीप पेशवे यांच्या नेतृत्वातील चमूने वैदिक खगोल विज्ञानाचे महत्त्व समजावून सांगितले. तिथी यंत्र चंद्राच्या भ्रमणानुसार कसे कार्य करणार, याची प्रणाली व हा उपक्रम स्वयंचलित करण्याकरिता कॉम्प्युटर, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल या विषयांचे प्राध्यापक संशोधन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. मोहनजी भागवत यांचे वेदमंत्रांनी स्वागत करण्यात आले. यावेळी आचार्य भूपेश गाडगे यांनी यंत्राची माहिती विस्ताराने उपस्थितांना सांगितली व जिज्ञासूंनी या यंत्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आचार्य भूपेश गाडगे, ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य, आचार्य पूजा गाडगे, रामदास फुलझले, रमेश मिश्रा, देवेंद्र दायरे, बालकनाथ केपी व सहकारी कार्यरत आहेत. याप्रसंंगी नागपूर व वर्धा जिल्ह्यांतील मान्यवर उपस्थित होते.