किमान तापमान : 23.35° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.35° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– ३१ मार्चपर्यंत मुदत, अन्यथा प्रवेश प्रक्रिया रद्द,
मुंबई, (४ मार्च) – राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतर्गत येणार्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन तसेच मानांकन करणे अनिवार्य असल्याच्या सूचना राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. असे न केल्यास संबंधित महाविद्यालयांना येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील तब्बल ६० टक्के महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन नसल्याचा समोर आले आहे. त्यामुळे हा आदेश देण्यात आला.
राज्यातील नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना उच्चतंत्र शिक्षण विभागाने ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अन्यथा मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना येणार्या शैक्षणिक वर्षापासून नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, या दृष्टिकोनातून या सर्व प्रक्रिया सर्व महाविद्यालयांनी पार पाडणे आवश्यक असल्याचे या आदेशात सांगितले आहे. राज्यातील विनाअनुदानित २,१४१ महाविद्यालयांपैकी केवळ १३८ महाविद्यालयांचे मूल्यांकन पुनर्मूल्यांकन पूर्ण झाल्याचे समोर आल्याने उच्चतंत्र शिक्षण विभागाने या विषयी गंभीर होऊन निर्देश दिला आहे.