किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– कसबा पोटनिवडणुकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया,
मुंबई, (४ मार्च) – पुण्यात अलिकडेच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने कसबापेठ हा गड गमावला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, देशात वाऱ्याने दिशा बदलली असल्याचे संकेत या घडामोडीतून प्राप्त होत आहेत.
बारामती येथे पत्रकारांसोबत चर्चा करताना त्यांनी उपरोक्त वक्तव्य केले. लोक आता पर्यायाबाबत विचार करीत असल्याचे कसब्यात भाजपाच्या झालेल्या पराभवावरून दिसत आहे. वार्याने दिशा बदलली असल्याचे पवार यांनी सांगितले. केरळ, तामिळनाडू, आंध‘प्रदेश, तेलंगणा, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपाचे अस्तित्व नगण्य आहे. या राज्यांमध्ये या वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. काँग्रेसची सरकारे भाजपाने कशी पाडली, याची आठवण मतदार ठेवतील, असे पवार म्हणाले.
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देशातील लोकशाहीसाठी अत्यंत चांगला असल्याचे पवार यांनी सांगितले. अलिकडेच नागालॅण्डमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली कामगिरी केली. एकूण ६० विधानसभा सदस्य असलेल्या या निवडणुकीत राकाँने १२ ठिकाणी उमेदवार दिले, त्यापैकी सात जागांवर विजय मिळाला असल्याचे पवार यांनी सांगितले. या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस दुसर्या क‘मांकाचा पक्ष ठरला आहे. राकाँचे सरचिटणीस नरेंद्र वर्मा यांना नागालॅण्डचे निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले असल्याचे पवार यांनी सांगितले.