किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात,
मुंबई, (३ मार्च) – सकाळी-सकाळी झालेल्या शपथविधीच्या काही अर्धवट कथा देवेंद्र फडणवीसांनी नुकत्यास सांगितल्या. मला देखील सांगितल्या, पण त्या अर्धवटच. जेव्हा फडणवीस या सुरसकथा पूर्ण सांगतील, तेव्हा मोठमोठ्यांना शॉक बसेल. मला ठावूक असलेली अर्धवट माहिती मी दिली तर, अनेकांची पंचायित होईल, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
चहापाणावर बहिष्कार टाकताना घेतलेल्या पत्रपरिषदेत अजित पवारांनी महाराष्ट्रद्रोह झाला असता, असे संबोधून सुरुवात केली. सुरुवात मी नाही केली, तुम्ही केली. खरं म्हणजे, अजितदादांकडून ही अपेक्षा नव्हती. शेकडो निष्पाप सामान्य मुंबईकरांचा जीव घेणार्या देशद्रोही दाऊद इब्राहिमशी तसेच देशद्रोहाचे आरोप असलेल्या लोकांशी आर्थिक व्यवहार करणार्या नवाब मलिकांचा मंत्रिपदाचा राजीनामा न घेता त्यांना पाठीशी घालणार्यांसोबत चहा पिण्याचा योग टळला, असे मी म्हणालो होतो. असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिले.
मुख्यमंत्री कोण एकदाच ठरवा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भावी मुख्यमंत्र्यांची स्पर्धा लागली आहे. सगळीकडे मोठमोठे पोस्टर लागतात. अजितदादाच म्हणाले, त्यांचा आकारदेखील सारखाच असतो. कोण लावलतात भावी मुख्यमंत्र्यांचे असे पोस्टर ते जरा शोधा…आणि सगळे एकत्र बसून काय तो एक निर्णय घेऊन एकदाच एक नाव ठरवा… असा खोचक टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
ऑनलाईन मुख्यमंत्र्यांचाचहापनावरचा खर्च तपासला का?
माझ्या सहा-आठ महिन्यांच्या काळातला वर्षा या शासकीय निवासस्थानावर झालेला चहापनावरचा खर्च आपण शोधला. मात्र, तुमचे आनलाईन मुख्यमंत्री कधी कोणाला भेट नव्हते, ठराविक एक-दोन लोकांव्यतिरिक्त कोणाला वर्षा बंगल्यावर प्रवेश नव्हता. अडीच वर्षे सामान्य नागरिकांसाठी प्रवेश बंद होता. माणसं नसताना, फेसबुक लाईव्ह असताना, ऑनलाईन असताना झालेला चहापानावरचा खर्च तुम्ही तपासला का? जरा तपासून पहा, लक्षात येईल. असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या टीकेवर केला. चहात काय सोन्याचे पाणी टाकतात का? या अजित पवारांच्या वाक्याचा समाचार घेताना, शिंदे म्हणाले, अरे सोन्याच्या पाण्याचे काय घेऊन बसलात, माझ्याकडे बंगल्यावर राज्यभरातून लाखो सोन्यासारखी लोकं रोज येतात, ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांना चहापानी विचारणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.
तुम्हीही घटनाबाह्य विरोधी पक्षनेता आहात का?
अलिकडे अजित पवार तर कडवट शिवसैनिक झाल्याचे बघायला मिळत आहे. जणूकाही ४० वर्षांपासूनचे जुने शिवसैनिक आहेत की काय? प्रवक्त्यांपेक्षाही प्रवक्ता झालेले आहेत. आता केवळ पदच द्यायचे बाकी आहे. अजितदादा त्यांच्या सुरात सुर मिळत रोज घटनाबाह्य सरकार म्हणून मोठमोठ्याने बोलतात. आमचे सरकार घटनाबाह्य, मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. एकतर जयंत पाटलांची संधी हिसकावून त्यांच्यावर अन्याय करून तेथे बसलात, असा टोलाही त्यांनी लगावला. घटनाबाह्य सरकारच्या तुमच्या वृत्तपत्राला जाहिराती चालतात, त्यांचे पैसे, आम्ही दिलेल्या सुविधा, सुरक्षा सर्व चालते, पण आम्ही घटनाबाह्य? असे कसे चालेल. काहीतरी एक ठरवा. असा चिमटाही त्यांनी काढला.