किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती,
मुंबई, (३ मार्च) – राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के तर, मदतनीसांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली.
अंगणवाड्यांमधील रिक्त पदांची भरती प्रकि‘या सुरू करण्यात आली आहे तसेच नवीन मोबाईल खरेदीही करण्यात येत आहे. या मोबाईल अॅपमध्ये ‘ट्रॅक अॅप’ आहे. त्यात माहिती अद्ययावत करताना नाव इंग‘जीत भरले असले, तरीही उर्वरित सर्व माहिती मराठीत भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोबतच, अंगणवाड्यांच्या वीज बिलं अदा करण्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे लोढा यांनी सांगितले.
यावेळी नेमकी वाढ किती झाली, हे स्पष्ट सांगण्याचा आग‘ह विरोधी सदस्यांनी धरला असता, मंत्री लोढा म्हणाले की, पुढे अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यात याबाबतची घोषणा होणार आहे. त्यामुळे आधीच मला याबाबत सभागृहाला माहिती अवगत करता येणार नाही. मंत्र्यांची ही तांत्रिक बाब संयुक्तिक असताना, केवळ राजकीय उद्देशाने विरोधकांनी सभात्याग केला.
आघाडी सरकारने निधी दिला : शेलार
सभात्याग केल्यानंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी अंगनवाडी सेविकांचा एवढा कळवळा आलेल्या विरोधकांनी आपल्या कार्यकाळात त्यांच्या हिताचे किती निर्णय घेतले आणि मानधनात किती वाढ दिली, याची माहिती देण्याची विनंती केली. यावेळी लोढा यांनी सांगितले की, यापूर्वी देवेंद्र फडणवीस मु‘यमंत्री होते, त्यावेळी मानधनात त्यांनी वाढ दिली होती आणि आता ही मोठी वाढ देखील त्यांनीच दिली आहे. आघाडी सरकारने मानधन दिले नव्हते. शिवाय अंगनवाडी सेविकांच्या प्रश्नावर एकही बैठक घेतली नव्हती.