किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादल– आशिष शेलार यांचा खळबळजनक आरोप,
मुंबई, (३ मार्च) – भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने दिला गेलेला पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला म्हणून आघाडी सरकारच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती, असा खळबळजनक आरोप भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केला. पुरवणी मागण्यांवर बोलताना शेलार म्हणाले की, लता मंगेशकर यांच्या निधनानंतर तत्कालीन आघाडी सरकारने त्यांच्या नावाने महाराष्ट्रात संगीत विद्यालय सुरू करण्याची घोषणा केली.
विद्यालयाच्या परवानगीची फाईल तयार झाली आणि ती तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. मात्र, दरम्यानच्या काळात मंगेशकर कुटुंबीयांनी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. हा पुरस्कार मोदी यांना दिला म्हणून तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना बोलावले नाही म्हणून छोट्या मनाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती. त्यानंतर सुदैवाने सरकार बदलले. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आणि पुन्हा त्या विद्यालयाला परवानगी देण्यात आली. दरम्यान, संगीत विद्यालय सुरू केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानतानाच, शेलार यांनी आता या विद्यालयाला विद्यापीठाची मान्यता देण्यात यावी तसेच येथे संगीत लायब्ररी सुरू करण्यात यावी, आंतरराष्ट्रीय दर्जाची वाद्य येथे उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केली.