किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.79°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– देशांतर्गत प्रवास करणारे १४ लाख ८० हजार, सहामाहीच्या तुलनेत ४१ टक्क्यांहून अधिक वाढ,
नागपूर, (२० नोव्हेंबर) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करणार्या हवाई प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. देशांतर्गत हवाई प्रवाशांची संख्या २०२२ मध्ये १०,६१,१३४ वरून २०२३ मध्ये १४,८०, २६१ वर गेली आहे. याशिवाय २०२२ मध्ये परदेशी प्रवाशांची संख्यादेखील १९ हजार होती. तर २०२३ मध्ये हीच आकडेवारी ४५ हजारावर गेली आहे. नागपूर विमानतळावरून प्रवास करणार्या विमान प्रवाशांची संख्या २०२२ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा ४१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे.
कोरोनाच्या काळात दरमहा ३० ते ४० हजारांपर्यंत आलेली प्रवाशांची संख्या आता अडीच लाखांपर्यंत पोहोचली आहे. २०२३ च्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी ते जून) कालावधीत १५ लाख २५ हजार ५२८ प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला. नागपूर विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत सतत वाढ असल्याने विमानतळ प्राधिकरणाला चांगल्या सुविधांकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.
परदेशी प्रवाशांच्या संख्येतही वाढ
नागपूर विमानतळावरुन देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करणार्या हवाई प्रवाशांमध्ये सतत वाढ होत आहे. २०२२ मध्ये परदेशी प्रवाशांची संख्या १९, २५० होती. तर २०२३ मध्ये हीच आकडेवारी ४५, २६७ वर गेली. देशांतर्गत हवाई प्रवाशांची संख्यादेखील २०२२ मध्ये १०,६१,१३४ वरून २०२३ मध्ये १४,८०, २६१ वर गेली. हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ सुधारित आर्थिक परिस्थितीचे दिशादर्शक आहे.