किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– परभणीत सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले,
– निवडणूक रद्द होण्याची नामुष्की,
परभणी, (२५ ऑक्टोबर) – ग्रामपंचायत निवडणुकीला मराठा आरक्षणाचा फटका बसताना दिसत आहे. परभणीतील वझुर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आणि संरपंचपदासाठी दाखल आलेले अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे या गावची निवडणूक रद्द होण्याच्या मार्गावर आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील वझुर येथील ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सरपंच आणि ११ ग्राम पंचायत सदस्य अशा १२ जागांसाठी या निवडणुकीत एकूण ३४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातले तीन सरपंचपदासाठी, तर ३१ सदस्यत्वासाठी अर्ज होते. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर करीत, आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक नाही, असा निर्धार करून सर्वच उमेदवारांनी अर्ज परत घेतले.
दुसरीकडे पालम तालुक्यातील चाटोरी ग्रामपंचायतमधील एका जागेसाठी पोटनिवडणूक होती. तिथेही चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, या चारही जणांनी बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या दोन्ही ठिकाणची निवडणूक रद्द होण्याच्या मार्गावर आहे.
पंढरपुरात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी
पंढरपुरात बुधवारपासून सर्वपक्षीय आमदार, खासदार मंत्री आणि पक्षांच्या पदाधिकार्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षण मिळाल्यावरच प्रवेश दिला जाणार आहे. मराठा आरक्षण मिळाल्यावरच सर्व आमदार-खासदारांना विठ्ठल दर्शनासाठी प्रवेश मिळेल. विविध पक्षांच्या मराठा पदाधिकार्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.