किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन,
नागपूर, (२७ ऑक्टोबर) – भरडधान्याच्या पाककृती या लोकांच्या पसंतीस उतराव्यात यासाठी भरडधान्याच्या पोषक मूल्यांच्या महत्त्वाच्या सोबतच या खाद्य उत्पादनाच्या पाककृतीची चव चांगली व्हावी याकरिता संशोधन संस्थांनी परस्पर समन्वय साधून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. दक्षिण नागपुरातील श्री आयुर्वेद महाविद्यालयात आज २७ ऑक्टोबरपासून ’जीवनशैलीतील व्याधींच्या प्रबंधन आणि व्यवस्थापनात भरड धान्याची भूमिका’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.केंद्र शासनाने यंदाचे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे,या अनुषंगाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी श्री आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्य ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते.
ज्ञानाची प्रासंगिकता ही त्याच्या व्यवहारिक उपयोगावर असते असे सांगून भरड धान्याच्या पोषण मूल्यासंदर्भात केवळ संशोधन पत्रिकेतच चर्चा न करता त्या धानाच्या पाककृती लोकप्रिय होण्यासाठी पाकविधीमध्ये ज्या बदलांची आवश्यकता आहे , ते बदल समाविष्ट करून या भरड धान्याच्या पाककृती उत्तमरीत्या तयार करणे आणि त्याचे ब्रॅण्डिंग करणे आवश्यक आहे .खाद्य तंत्रज्ञानाच्या महाविद्यालयासोबत आयुर्वेद महाविद्यालयाने सुद्धा सामंजस्य करार करून या भरडधान्याच्या प्राककृति विकसित करण्याबाबत धोरण आखावे असे गडकरी यांनी यावेळी सुचविले.
भरडधान्यांमध्ये प्रथिने आणि कर्बोदके यांचे प्रमाण जास्त आहे नुकत्याच संपन्न झालेल्या जी-२० च्या परिषदेत सर्व देशांच्या प्रमुखांना भरड धान्याचे पदार्थ देण्यात आले होते , असे देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
या चर्चासत्रात दरम्यान भरड धान्यावर पाक कला स्पर्धा आणि विविध कार्यक्रम आयोजित केल्या जात असून या चर्चासत्रात आयुर्वेदिक शिक्षक, वैद्य, पदवीधर, पदवीधर विद्यार्थी, कृषी महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, गृह विज्ञान, महाविद्यालयांची विद्यार्थी सहभागी झाले आहेत.