किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.47°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनागपूर, (१५ ऑक्टोबर) – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला आज धमकीचे पत्र मिळाले आहे. दोन न्यायमूर्तींनी मालमत्ता कर प्रकरणात प्रतिकूल निकाल दिल्यास त्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. एका अधिकार्याने सांगितले की, नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. नागपूर खंडपीठाला ११ ऑक्टोबर रोजी हे पत्र प्राप्त झाले असून वरुड नगरपरिषदेच्या मालमत्ता करवाढीला आव्हान देणार्या प्रभाकर काळे यांच्या याचिकेवर दोन न्यायमूर्तींनी प्रतिकूल निकाल दिल्यास त्यांच्यावर बॉम्ब हल्ला केला जाईल, असे म्हटले होते.
हे पत्र काळे यांच्या नावाने पाठवण्यात आल्याचे अधिकार्याने सांगितले आणि न्यायालय प्रशासनाने तत्काळ ही बाब पोलिसांना कळवली. ते म्हणाले की अमरावती ग्रामीण पोलिसांनी याचिकाकर्त्याची चौकशी केली, त्यांनी धमकीचे पत्र लिहिण्यात कोणताही सहभाग नाकारला.अधिकार्याने सांगितले की, काळे यांच्या वकिलांनीही त्यांच्या विधानाची पुष्टी केली आणि असे सुचवले की काळे यांची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी हे पत्र पाठवले गेले असावे. ते म्हणाले की पत्राचा स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू आहे आणि पोलिस महत्त्वाच्या संकेतांसाठी जवळील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत.