किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.91° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.91° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– अनेक वस्त्या जलमय, रेल्वे स्थानकातही घुसले पाणी,
नागपूर, (२३ सप्टेंबर) – शुक्रवारी मध्यरात्रीनंतर नागपुरात अतिमुसळधार पाऊस पडला. ढगफुटी झाल्याने आणि दोन तासांत ‘अति’रेकी पाऊस पडल्याने शहरातील असंख्य वस्त्या जलमय झाल्या. विविध नगरे आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने शहरात जनजीवन विस्कळीत झाले. शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने लष्कराला मैदानात उतरावे लागले, त्याचप्रमाणे एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे जवानही पहाटेपासूनच मदतकार्य करीत होते. जलमय भागांमधून नागरिकांना बोटींमधून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नागनदीला पूर आला, त्याचप्रमाणे नाले ‘ओव्हर फ्लो’ झाले अन् वाट मिळेल तिकडे पाणी घुसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. सीताबर्डी या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोरभवन बसस्थानकामध्ये सहा ते आठ फूट पाणी घुसल्याने बसेसही पाण्यात बुडाल्या होत्या. या स्थानकातून बाहेरगावी जाणार्या आणि शहरात फिरणार्या बसेच जागेवरच उभ्या ठेवाव्या लागल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.
नाग नदीच्या काठच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांच्या संपत्तीचे प्रचंड नुकसान झाले आहे तसेच या पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. पाणी शिरल्याने अनेक वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मध्यरात्री विजांचा प्रचंड कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता शहर जलमय झाले अन् पाणी घरांमध्ये घुसले. काय घडते आहे, हे कळायच्या आत घराघरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरले. वस्त्या आणि रस्त्यांवरील पाण्याची पातळी वाढत गेली. पहाटेपासूनच फोन खणखणायला लागले आणि शहरातील महापुराची माहिती घरोघरी पोहोचू लागली. सूर्योदय झाल्यावर संकटाची तीव‘ता लक्षात आली आणि काळजी वाढली. शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नागनदीला पूर आला आणि या पुराच्या पाण्याने शहरात हाहाकार माजवला. एसडीआरएफच्या २ तुकड्या ७ गटात विभागण्यात आल्या असून, सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत १४० नागरिकांना तसेच मुक-बधीर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीसांचे ट्विट, म्हणाले…
नागपुरातील मुसळधार पावसाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एक ट्विट केले. फडणवीसांनी यात म्हटले आहे की, नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या ४ तासांत १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी मला दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून, तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या २ चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
नागपूर शहर परिसरातील संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकार्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचा निर्देश त्यांनी दिला. धोकादायक घरे आणि नदीकाठच्या वस्तीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी तत्काळ हलविण्याच्या सूचना दिल्या. तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.