किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-एनसीपीत अजित विरुद्ध रोहित ?,
नाशिक, (२३ सप्टेंबर) – अजित पवार गटातला एकही माणूस असा नाही, जो कोणाला ब्लॅकमेल करेल. काहीही आपलं बोलायचं, उलट रोहित पवार आणि सगळ्यांनी मंत्रीमंडळात जायचं, असा निर्णय घेत त्या पत्रावर सह्या केल्या असल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विरोधी पक्षात असल्यावर असं काही बोलायला पाहिजे, नाहीतर विरोधी पक्षाचे आमदार म्हणून कसं सिद्ध होईल? यासाठी हा खटाटोप असल्याचा टोमणा देखील भुजबळ यांनी लगावला आहे.
गेल्या काही दिवसात रोहित पवार आणि अजित गटातील नेत्यांचा संघर्ष टोकाला गेला आहे. शरद पवार गटाचे एक आमदार आणि खासदार अजित पवार गटात जाण्याबाबत रोहित पवारांनी गंभीर आरोप केले. ’’एखादे महत्वाचे काम तोपर्यंत आम्ही करणार नाही, जोपर्यंत तुम्ही सही करत नाही, अशा काही घटना घडत असल्याचे आम्हाला कळतंय. मग अशा पद्धतीने जर ब्लॅकमेल करून जर नेत्यांना धमकावणे चुकीचे आहे. शेवटी आमदाराला काय पाहिजे असतं तर त्याच्या मतदार संघामध्ये एखादा विषय मार्गी लावण्यासाठी निधीची गरज असते. मग एखाद्या शेतकर्याचा प्रश्न असो, कष्टकर्यांचा असो, किंवा युवांचा अडकलेला प्रश्न असो. तो प्रश्न सुटावा यासाठी प्रामाणिक पद्धतीने प्रयत्न करत असतात, ’मग तू सही कर, नाहीतर हे काम होणार नाही, असे कदाचित काही नेते सांगतात, असं कळतंय. अशा पद्धतीने आज कदाचित तो आकडा तुमच्या बाजूने दिसेल, जेव्हा निवडणुका जवळ येतील, तेव्हा त्यांना कळेल की खरेच किती लोक त्यांच्याबरोबर आहेत, असं रोहित पवार म्हणाले होते.
यावर भुजबळ यांनी रोहित पवार यांचा समाचार घेत मंत्रिमंडळात जाण्यासाठी रोहित पवार यांच्यासह सगळ्यांच्या सह्या पत्रावर करण्यात आल्या होत्या, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला आहे. न्यायालयीन सुनावणीवर भुजबळ म्हणाले की, कायदेशीर लढाई लढणार नाही, असे पवार साहेब म्हणाले होते. पण त्यांनी नोटीसा पाठवल्या आहेत. बघू काय होते ते ! दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आधी आमदार रोहित पवारांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. आता आम्ही सत्तेत गेल्यावर ते अजित पवारांची जागा घेऊ पाहतायेत, असा गौप्यस्फोट अजित पवारांचे कट्टर आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला. अजित दादांचं स्थान कुणीतरी घेऊ पाहिलं तर ते होणं शक्य नाही. रोहित पवार यांनी स्वतःची ओळख निर्माण करावी, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावे. स्वतःचे स्थान निर्माण करण्याकरिता त्यांचा खटाटोप सुरू असल्याचे शेळके यांनी म्हटले आहे.