किमान तापमान : 23.35° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.35° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलपुणे, (२३ सप्टेंबर) – काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी करून भाजपा-शिवसेना युतीला जाऊन मिळालेले चुलत भाऊ अजित पवारांविषयी मी कधीही बोलले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सांगितले. सुप्रिया सुळे गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी पुण्यात आल्या असताना त्या बोलत होत्या. अजित पवार यांच्यासह पक्षाचे काही ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का बसला होता.
कसबा येथे गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, मी कधीच देवाकडे काही मागत नाही, मी त्याचे आभार मानते. यावर्षी राज्यात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा, यासाठी मी श्रीगणेशाला प्रार्थना केली.संसदेतील भाई (भाऊ) या आपल्या अलिकडच्या वक्तव्याबद्दल विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजितदादा माझे मोठे भाऊ आहेत आणि मी त्यांच्या विरोधात कधीच काही बोलले नाही. मी संसदेत जे काही बोलले ते कोणा व्यक्तीच्या विरोधात नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विधानाविरोधात होते.
महिला आरक्षण विधेयकावर संसदेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, प्रत्येक घरात असा भाऊ नसतो, ज्याला बहिणीचे कल्याण पाहणे आवडते. भाजपाने नेहमीच सूडाचे राजकारण केले. आमच्यावर केलेले आरोप खरे असतील तर, चौकशी होऊ द्या. आरोप खोटे निघाले तर भाजपाने आमची माफी मागावी, असेही त्या म्हणाल्या. भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्या विरोधात सभागृहात केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे अत्यंत दुर्दैवी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग‘ेसने या घटनेबाबत लोकसभा सभापतींना आधीच पत्र लिहिले आहे.