किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, (२४ सप्टेंबर) – नागपुरात शुक्रवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळल्याची माहिती मिळताच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सखल भागांत अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत करण्याचा आदेश दिला.याबाबतचे एक ट्विट त्यांनी केले. यात म्हटले आहे की, नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या ४ तासांत १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी मला दिली.
नागपूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून, तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या २ चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
नागपूर शहर परिसरातील संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकार्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचा निर्देश त्यांनी दिला. धोकादायक घरे आणि नदीकाठच्या वस्तीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी तत्काळ हलविण्याच्या सूचना दिल्या. तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.