|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.68° से.

कमाल तापमान : 24.89° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 55 %

वायू वेग : 6.12 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.89° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.65°से. - 27.79°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.72°से. - 28.15°से.

सोमवार, 27 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.04°से. - 26.71°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home » विदर्भ » खारे पाणी होणार गोड!

खारे पाणी होणार गोड!

-पाण्याचा पिण्यासाठी व सिंचनासाठी उपयोग,
-केंद्रीय मंत्री गडकरींच्या प्रेरणेतून प्रकल्प,
अमरावती, (१० जून) – पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यांत पूर्णा नदीच्या गाळाचा प्रदेश आहे. ज्यापैकी जवळपास तीन हजार चौ. किमी क्षेत्रांत खार्‍या पाण्याची समस्या आहे. या समस्येवर मात करून शेतकर्‍यांना पिण्यासाठी व शेतीसाठी गोडे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथे साकारल्या जात असलेल्या गोड पाण्याच्या प्रायोगिक प्रकल्पाची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली. त्यांच्याच प्रेरणेतून हा प्रकल्प साकारला जात आहे. यावेळी खासदार अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसकळे, आमदार बळवंत वानखडे, विभागीय आयुक्त निधी पांडे, जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्यासह पाहणी केली. भाजपाचे पदाधिकारी यावेळी हजर होते.
या प्रायोगिक प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर या खार्‍या पाण्याच्या पट्ट्यात येत असलेल्या अमरावती, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यांतील एकूण ८९४ गावांना जमिनीपासून केवळ ५० फूटांच्या खोलीवर गोडे पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. ‘डायलुशन इज द सोल्युशन फॉर ऑल टाईप ऑफ पोल्युशन’ या तथ्याचा उपयोग करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. याअंतर्गत बोराळा गावात एका नाल्यावर बंधारा बांधण्यात येत आहे. या नाल्यासह एक मोठे शेततळे तयार करण्यात येत आहे, ज्यामध्ये ९ कोटी ४० लाख लिटर पावसाचे गोड पाणी साठवण्यात येणार आहे. जमिनापासूनच्या पहिल्या वाळूच्या थरातून अंदाजे ३ कोटी लिटर खारे पाणी बाहेर काढून फेकले जाईल, ज्यामुळे ९ कोटी लिटर पाणी बंधार्‍यात थांबेल व ३ कोटी लिटर पाणी वाळूच्या थरात जाईल. बोराळ्याच्या या एका प्रायोगिक प्रकल्पामुळे अशा एकूण १२ कोटी लिटर गोड पाण्यावर ४० हेक्टर म्हणजेच १०० एकर जमिन बारमाही ओलिताखाली येईल. टिंबर सिंचनाचा प्रयोग केला, तर २०० एकर जमिनीला बारमाही गोड पाणी उपलब्ध होईल.
या पूर्ण प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भूसंपादन नाही, स्थलांतर नाही तसेच पुनर्वसनही नाही त्यामुळे खर्च कमी असेल. प्रकल्पामुळे खारपाण पट्ट्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघेल व शेतीसाठीही मुबलक प्रमाणात गोड पाणी उपलब्ध होईल. पूर्णा नदीला येणार्‍या महापूराची तीव्रता कमी होईल. एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला, तरी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. प्रकल्पात निघालेली काळी माती शेतकर्‍यांची जमिन सुपिक करू शकेल. पिवळ्या मातीने गावरस्ते, शिवरस्ते, शेतरस्ते तयार केले जाऊ शकतील. प्रकल्पात वाळूच्या थरातून उपलब्ध होणारे खारे पाणी शेततळे करून साठवले, तर त्यात मत्स्य व्यवसाय सुरू करता येईल, ज्याचा शेतकर्‍यांना आर्थिक फायदा होऊ शकतो. अकोला, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ४ लाख ६९ हजार २०० हेक्टर खारपाण पट्ट्यातील जमिनीवर असे ९४० बंधारे बांधले, तर ४,६०,६०० हेक्टर जमिनीला मुबलक प्रमाणात बारमाही गोड पाणी उपलब्ध होऊ शकेल, असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. राज्य शासन व स्थानिक खासदार आणि आमदारांनी या प्रकल्पाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Posted by : | on : 11 Jun 2023
Filed under : विदर्भ
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g