किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
23.64°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलसुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वॉटर ईज लाईफ सोसायटीचा सत्कार,
चंद्रपूर, (२३ फेब्रुवारी ) – गेल्या १२ वर्षापासून अविरतपणे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांची तृष्णातृप्ती करण्याचे काम महत्कार्य करणार्या वॉटर ईज लाईफ सोसायटीचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष सत्कार केला. दुष्काळात टँकर लावून जंगलातील पाणवठे भरण्यापासून, तर सौर उर्जेचा वापर करून स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणवठे दिवसरात्र भरून ठेवण्याचे काम या संस्थेने केले आणि त्याची विशेष दखल वनमंत्र्यांनी ताडोबाच्या वर्धापनदिन सोहळ्यात घेतली. या संस्थेचे संस्थापक सदस्य धनंजय बापट आणि त्यांच्या चमूने हा सत्कार स्वीकारला.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा २८ वा स्थापना दिवस गुरुवार, २३ फेब्रुवारी रोजी चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. बाळू धानोरकर, आ. किशोर जोरगेवार, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक डॉ. जितद्र रामगावकर, बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक, श्वेता बड्डू, देवाशिष जेना प्रभृती उपस्थित होते. गेल्या १२ वर्षापासून ताडोबासह, बोर, पेंच, कान्हा आणि नानज जंगलातील वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करून पाण्याची व्यवस्था करण्याचा अभिवन उपक्रम वॉटर ईज लाईफ सोसायटीच्या वतीने होत आहे. एखाद्या अशासकीय संस्थेने असे कार्य करण्याचे उदाहरण कदाचित कुठे सापडेल. वन्यजीव आणि जंगलावर प्रेम करणार्या १० मित्रांनी एकत्र येऊन कुठलाही शासकीय निधी न घेता हा उपक्रम राबवला. या कार्यात बापट यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
वैशिष्ठ्यपूर्ण बचाव वाहन दिल्याबद्दलही कौतुक
ताडोबा आणि परिसरात मानव व वन्यजीवांचा संषर्घ टाळताना प्रसंगी, वाघांना जेरबंद करावे लागते आणि त्यासाठी त्यांना बेशुध्द करणे जिकरीचे असते. अशावेळी जंगलात कुठेही सहज नेता येईल आणि मोहिमेवर असणार्यांनाही सुरक्षा देता येईल अशा वाहनाची प्रकल्पाला गरज होती. तसे देशातील पहिले वाहन तयार करण्याची संकल्पना राबवून त्याचे संयोजन धनंजय बापट यांनी केले. प्रसिध्द उद्योजक विवेक आणि जिता गोयनका यांच्या सहकार्याने हे वाहन ताडोबाला हस्तांतरित झाले. या कार्यासाठीही मुनगंटीवार यांच्या हस्ते बापट यांचा सत्कार करण्यात आला.