किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
23.64°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनागपूर, (१६ फेब्रुवारी ) – पुढील महिन्यात आयोजित होणार्या जी-२० या जागतिक परिषदेसाठी नागपूर शहर सज्ज होत आहे. नागपूर महानगर पालिकेच्यावतीने महत्वाच्या शासकीय संस्थांच्या संरक्षक भिंती, चौकांमध्ये सिंथेटिक पॅच आदी सौंदर्यीकरणाची कामे सुरु आहेत. महत्वाचे शासकीय कार्यालये असणार्या सिव्हिल लाईन्स परिसरात सौदर्यीकरणाचे विविध कामे सुरु आहेत.
येथील राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या संरक्षक भींतींवर सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. याच रस्त्याने पुढे जीपीओ चौकात सुंदर व सुबक सिंथेटिक पॅच (२५द६फुट आकाराचे तीन सिंथेटिक पॅच) तयार करण्यात आले आहेत. देवगिरी चौकाकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक भिंतींवर विविध भूमीतीय आकारांच्या आणि फळांच्या आकाराच्या कलाकृती रेखाटण्यात आल्या आहेत.
देवगिरी चौकात चारही बाजुंनी सिंथेटिक पॅच (२५द६ फुट आकाराचे) तयार करण्यात आले आहेत. तर लेडिज क्लबच्या संरक्षक भिंतींवर शार्क मासा, ऑक्टोपस आदी समुद्री जीव उत्तमरित्या रेखाटण्यात आली आहेत. याच चौकात जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाच्या संरक्षक भिंतींवर वाघ, सिंहासह विविध वन्य प्राणी आणि वारली चित्रे रेखाटण्यात आली आहेत.
यासोबतच भोले पेट्रोल पंप चौक,व्हीएनआयटी चौक, दीक्षाभूमी समोरील माताकचेरीच्या संरक्षक भिंतींवर सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहेत.या सर्व सौंदर्यीकरणामुळे या परिसरास देखणे रुप प्राप्त झाले आहे. जी-२० परिषदेसाठी शहराची सज्जता यातून ठळकपणे दिसून येते.