किमान तापमान : 24.27° से.
कमाल तापमान : 24.82° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 67 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.27° से.
23.74°से. - 24.75°से.
रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलधाराशिव : जून महिन्यात सरासरीच्या अधिक पाऊस पडला. मात्र त्यानंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे जुलैचा अर्धा महिना संपला तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजाच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस आणखी वाढ होतांना दिसत आहे. मृग नक्षत्रातील पावसावर विसंबून धाराशिव जिल्ह्यातील १,९५,७०० हेक्टर जमिनीवर खरिपाची पेरणी झाली आहे़. आगामी आठवड्यात पाऊस न झाल्यास सुमारे १,१८,८०० क्षेत्रावर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावणार असल्याचे आपत्कालीन पीक नियोजन आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. आजही जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या कायम असून शेकडो गावांना १४९ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़. जिल्ह्यात सुमारे ८३६ विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात मोठा पाऊस झाला नाही तर पाणीटंचाईचे सावट अधिकच गडद होणार असल्याचे चित्र आहे. २५ जुलैपर्यंत जिल्ह्यात पाऊस पडल्यास ३,११,६१६ हेक्टर पेरणी होऊ शकते, असा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. धाराशिव , तुळजापूर, भूम, परंडा आदी तालुक्यात जुलै महिन्यात पाऊसच झालेला नाही.
Short URL : https://vrittabharati.in/?p=23930