किमान तापमान : 30.07° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 89 %
वायू वेग : 1.81 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
29.13°C - 30.99°C
sky is clear28.81°C - 31.29°C
sky is clear28.62°C - 30.72°C
sky is clear28.55°C - 29.71°C
few clouds28.63°C - 29.55°C
broken clouds28.39°C - 29.39°C
overcast clouds– १३.२५ कोटी रुपयांचे नुकसान,
राज्यातील किमान ४६ बस डेपो बंद,
मुंबई, (०५ सप्टेंबर) – मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) २५० पैकी किमान ४६ बस डेपो पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत आणि एमएसआरटीसीचे गत काही काळात १३.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांतील बस संचालनाला या आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे, असे एमएसआरटीसीच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले.
गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये २० बसेस जाळण्यात आल्या व १९ बसेसचे नुकसान झाले. बसेसच्या नुकसानीमुळे एमएसआरटीसीला ५.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विविध भागांमध्ये झालेल्या आंदोलनांमुळे तिकीट विक्रीत ८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एमएसआरटीसी ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक संस्था असून संस्थेच्या ताफ्यात १५,००० पेक्षा जास्त बसेस आहेत. येथून दररोज सुमारे ६० लाख प्रवासी प्रवास करतात.