|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.79° C

कमाल तापमान : 30.26° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 76 %

वायू वेग : 3.96 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.26° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.7°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.13°C - 30.93°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.35°C - 29.77°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.06°C - 29.68°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.83°C - 29.23°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.7°C - 29.15°C

sky is clear
Home » महाराष्ट्र » महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना पदके जाहीर

महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना पदके जाहीर

-३ अधिकार्यांना राष्ट्रपती पदक; ३३ पोलिसांना शौर्य,
-अमरावतीच्या नाईकनवरे यांचा समावेश,
नवी दिल्ली, (१४ ऑगस्ट) – पोलिस सेवेत उल्लेेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील प्रवीण सांळुके, विनय चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकार्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदके जाहीर करण्यात आली. तसेच ३३ पोलिसांना शौर्य पदके आणि ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदके असे राज्यातील एकूण ७६ पोलिसांना पदके जाहीर कण्यात आली आहेत. जयंत नाईकनवरे अमरावतीचे आहेत.
राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक आणि पोलिस शौर्य पदक, जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करताना उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदके दिली जातात. यावर्षी देशभरातील ९५४ पोलिसांना पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहेत. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदकांमध्ये राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आणि अमरावतीचे विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांचा समावेश आहे.
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदके ४० पोलिसांना जाहीर झाले. यात प्रवीणकुमार पडवळ (पोलिस सहआयुक्त, मुंबई), विजय पाटील (उप महानिरीक्षक, एसीबी, मुंबई), राजेश वाघ, अरुण सावंत, बाळकृष्ण हनपुडे पाटील, अधिकराव पोळ, माया मोरे, आनंद वाघ, संजू जॉन, सुभाष दूधगावकर, तन्वीर शेख, मनीषा नलावडे, विकास घोडके, अनिल काटके, व्यंकटेश पलकुर्ती, वलू लाभाडे, अरुणकुमार सपकाळ, संजय जाधव, उमर शेख, रविकांत कदम, प्रदीप तांगडे, द्वारकादास चिखलीकर, चंद्रकांत साळुंके, दिनेश म्हात्रे, मोहम्मद अस्लम शेख हमीद शेख, सुनील नवार, संजय माळी, अंबादास हुलगे, शामराव गडाख, मोहन डोंगरे, नागनाथ फुटाणे, विजय आवकीरकर, भानुदास पवार, अशोक लांडे, भास्कर कदम, गुरुनाथ गोसावी, जगदीश भुजाडे, विजय बावीस्कर, कैलास नागरे आणि महादेव पाटील यांचा समावेश आहे.

Posted by : | on : 14 Aug 2023
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g