|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.97° C

कमाल तापमान : 30.18° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 55 %

वायू वेग : 4.03 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.97° C

Weather Forecast for
Saturday, 04 May

27.69°C - 30.2°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.7°C - 30.89°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.18°C - 31.32°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.41°C - 30.74°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.99°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.74°C - 29.94°C

sky is clear
Home » मुंबई-कोकण » मुंबई विमानतळावर शिवसैनिकांची तोडफोड

मुंबई विमानतळावर शिवसैनिकांची तोडफोड

अदानी समूहाचा फलकही तोडला,
मुंबई, २ ऑगस्ट – अदानी एअरपोर्टच्या फलकाला विरोध करीत शिवसैनिकांनी आज सोमवारी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर तोडफोड केली. या विमानतळाचे संचालन आता अदानी समूहाच्या हाती असून, शिवसैनिकांनी अदानी एअरपोर्ट हा फलक तोडला.
या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, असे नाव देण्यात आले आहे. मात्र, आता येथे अदानी एअरपोर्ट असा फलक लावण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
मागील काही वर्षांपासून अदानी समूहाने उड्डयन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. देशातील कित्येक विमानतळांचे संचालन अदानी समूहाकडे आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन अदानी समूहाकडे जुलै महिन्यात आले होते. याबाबतची माहिती खुद्द गौतम अदानी यांनी ट्विट करीत दिली होती.
कंपनीच्या प्रवक्त्याचे स्पष्टीकरण
अदानी एअरपोटर्‌‌सच्या ब्रॅण्डिंगव्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ब्रॅण्डिंगमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. टर्मिनलच्या स्थितीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे अदानी एअरपोर्टच्या प्रवक्त्याने सांगितले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नियम आणि दिशानिर्देशांप्रमाणेच या विमानतळाचे ब्रॅण्डिंग केले जात आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या दिशानिर्देशांचे पालन अदानी समूह करीत आहे, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले.

Posted by : | on : 3 Aug 2021
Filed under : मुंबई-कोकण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g