किमान तापमान : 31.53° C
कमाल तापमान : 37.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 37 %
वायू वेग : 10.33 Mps
स्थळ : Mumbai, IN
37.99° C
29.15°C - 37.99°C
sky is clear28.89°C - 31.93°C
few clouds28.6°C - 30.98°C
sky is clear28°C - 30.25°C
sky is clear27.69°C - 29.24°C
sky is clear27.43°C - 29.24°C
sky is clear– कंगना राणावतचा उद्धव ठाकरेंवर निशाणा,
मुंबई, (१८ फेब्रुवारी ) – बॉलिवूडची ‘पंगाक्विन’ कंगना राणावत वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. आता एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर कंगनाने ट्विट करीत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कंगनाने लिहिले आहे, ‘वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात् इंद्रालादेखील शिक्षा मिळाली आहे. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझे घर तोडले, त्यावेळीच मला वाटले होते की, यांचे वाईट दिवस आता सुरू होणार. एका स्त्रीचा अपमान करणार्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही.’
उद्धव ठाकरेंचे सरकार असताना कंगनाच्या घराचा काही भाग मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडला होता. त्यावेळी देखील कंगना उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली होती, ‘आज माझे घर पाडले आहे, उद्या तुमचा गर्व मोडून पडेल. प्रत्येकाची वेळ येते… लक्षात असू द्या.’
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली असून, ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, अभिनेता आरोह वेलणकरने ट्विट करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. त्याने लिहिलेे, अभिनंदन एकनाथ शिंदे… बाळासाहेब पण खूश असतील आज. आरोहच्या या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.