|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.23° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 89 %

वायू वेग : 1.77 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.81°C - 31.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.58°C - 31.35°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.47°C - 30.26°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.66°C - 30.17°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.35°C - 29.99°C

broken clouds
Home » महाराष्ट्र » यंदा महाराष्ट्रात दुष्काळाच्या २२ जिल्ह्यांना झळा

यंदा महाराष्ट्रात दुष्काळाच्या २२ जिल्ह्यांना झळा

मुंबई, (०७ सप्टेंबर) – महाराष्ट्र दुष्काळी संकटाच्या सावटाखाली आहे. राज्यात यावर्षी फार कमी पाऊस पडला. त्यामुळे आगामी काळात पाऊस पडला नाही तर, पाणीटंचाईच्या झळा जास्त तीव‘ झालेल्या बघायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, राज्यात सध्याच्या स्थितीत कमी पाणीसाठा आहे. अनेक धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहू शकते. याशिवाय पाऊस नसल्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील काही भागांत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
राज्यातून पावसाने सुटी घेतली आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. गेल्या महिन्यात हवा तसा पाऊस पडला नाही. ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबरमध्ये तरी पाऊस होईल, अशी आशा लावून बसलेल्या बळीराजाच्या पदरी आता निराशाच पडली आहे. कारण, पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील २२ जिल्हे कोरडेठाक आहेत. तलाव, विहिरील कोरड्या पडल्यामुळे पिकं करपू लागली आहेत. विदर्भ, मराठवाडाच नाही तर, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत. या भागात पाणी चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस पडत नसल्याने किमान सरकारने तरी लक्ष द्यावे, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. राज्यातील १९९५ गावे आणि वाड्या-वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ४०६ टँकर तैनात करण्यात आली आहेत. कमी पावसाचा राज्यातील १४ जिल्ह्यांच्या १०५४ महसूल मंडळातील पिकांवर परिणाम झाला आहे.
गेल्या तीन महिन्यांमध्ये सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. पावसाच्या कमतरेचा राज्यातील एक तृतीयांश पिकांवर परिणाम झाला आहे. राज्यातील २५७९ महसूल मंडळांपैकी ४४६ महसूल मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा कमी पाऊस पडला आहे तर, ६०८ महसूल मंडळांमध्ये १५ दिवसांपेक्षा जास्त काळ पाऊस नाही, असे कृषी कार्यालयाच्या अहवालात म्हटले आहे.
महत्त्वाच्या धरणांमधील पाणीसाठा किती?
कोयना धरणात ८०.३६ टक्के
उजनी धरणात १७.५४ टक्के
जायकवाडी धरणात ३२.९४ टक्के
माजलगाव धरणात १२.५९ टक्के
मांजरा धरणात २३.९८ टक्के

Posted by : | on : 7 Sep 2023
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g