किमान तापमान : 28.41° C
कमाल तापमान : 29.24° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 67 %
वायू वेग : 2.81 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.41° C
27.78°C - 31.51°C
sky is clear27.04°C - 30.1°C
sky is clear27.14°C - 30.14°C
sky is clear27.93°C - 31.21°C
sky is clear28.16°C - 30.75°C
sky is clear27.97°C - 29.74°C
sky is clear– जदएसने दिले समर्थनाचे आश्वासन,
– शिवकुमार म्हणाले; मला घाई नाही,
बंगळुरू, (०५ नोव्हेंबर) – कर्नाटकचे सध्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी जदएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांची ‘ऑफर’ नाकारली आहे. कुमारस्वामी यांनी शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यासाठी ही ‘ऑफर’ दिली होती व आपल्या आमदारांचे त्यासाठी समर्थन देण्याचे म्हटले होते. त्यावर शिवकुमार म्हणाले- आम्ही एकत्र लढलो. आम्हाला सुशासन द्यावे लागेल. मला मुख्यमंत्रिपदाची घाई नाही. मी कोणाकडेही किंवा पक्षाच्या नेतृत्वाकडे याची मागणी केली नाही.
खरे तर, सत्ताधारी काँग्रेस आणि सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी संघर्ष सुरू असल्याचे वृत्त आहे. या पृष्ठभूमीवर कुमारस्वामी म्हणाले, पुढे जायचे असेल, तर ते जदएसच्या १९ आमदारांसह पाठिंबा देण्यास आम्ही तयार आहेत. पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले की, डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्यास, ते आमच्या १९ आमदारांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहू शकतात.
सिद्धरामय्या यांच्यावर टीका करीत जदएसचे नेते म्हणाले की, काँग्रेसमधील सध्याची परिस्थिती पाहता, मला माहीत नाही की पक्षातील किती लोक मुख्यमंत्री होण्यास तयार आहेत. आपण या सरकारला टीसीएम किंवा डीसीएम सरकारदेखील म्हणू शकता. टीसीएम म्हणजे तात्पुरते मुख्यमंत्री आणि डीसीएम म्हणजे डुप्लिकेट मुख्यमंत्री.