किमान तापमान : 29.25° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 3.87 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
28.8°C - 29.99°C
sky is clear28.38°C - 29.98°C
sky is clear28.23°C - 29.83°C
sky is clear27.84°C - 29.32°C
sky is clear28.12°C - 29.82°C
light rain28.36°C - 29.87°C
broken cloudsतिरुवनंतपुरम, (१७ जानेवारी) – येत्या २२ जानेवारीला अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे. त्यानिमित्त देशभरात दिवाळी साजरी होणार आहे. या दिवशी केरळसह देशभरातील सर्व लोकांनी आपापल्या घरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करावी. केरळमध्ये श्रीराम ज्योत पूर्ण भक्तिभावाने प्रज्वलित व्हावी. देशात स्वच्छता मोहीम राबवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. केरळच्या लोकांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. राम मंदिराच्या निमित्ताने ११ दिवस मी धार्मिक विधीही करीत आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
येथे ‘शक्ती केंद्र प्रभारी संमेलना’ला संबोधित करताना मोदी म्हणाले, आम्ही त्रिशूर येथील नारी शक्ती संमेलनादरम्यान केरळ भाजपाच्या कार्यकर्त्यांची क्षमता पाहिली. मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो की, केवळ एक मजबूत संघटनाच एवढी मोठी परिषद आयोजित करू शकते. भाजपा हा एकमेव असा राजकीय पक्ष आहे ज्याच्याकडे वेगवान विकासाचा मार्ग आहे आणि भविष्यासाठी दृष्टी आहे.
अलिकडेच नीती आयोगाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या नऊ वर्षांत सुमारे २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. काँग्रेसने पाच दशके केवळ गरिबी हटाओचाच नारा दिला. विकसित भारतासाठी आपण कोणत्या मार्गावर चाललो आहोत हे यावरून दिसून येते. लोकसभेच्या निवडणुका देशाचे सरकार निवडण्यासाठी आहेत. आम्हाला आमच्या मतदारांना सांगायचे आहे की, १० वर्षांपूर्वी दर दुसर्या दिवशी दहशतवादी हल्ले होत होते. त्यामुळे आमच्या गुंतवणुकीवर आणि परदेशात राहणार्या लोकांवर परिणाम झाला होता.
कोचीत चार हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते कोची येथे चार हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये धोरणात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या कोटी शिपयार्ड लिमिटेडचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे देशातील दक्षिण भागाच्या विकासाचा वेग वाढेल, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.