किमान तापमान : 28.5° C
कमाल तापमान : 29.53° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 2.35 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.5° C
27.51°C - 30.64°C
few clouds27.62°C - 30.93°C
sky is clear27.82°C - 31.09°C
sky is clear28.3°C - 31.08°C
sky is clear28.42°C - 30.7°C
sky is clear27.95°C - 30.1°C
sky is clearअमरावती, (२२ सप्टेंबर) – येथील न्यायालयाने शुक्रवारी तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांच्या न्यायालयीन कोठडीत २४ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त महाधिवक्ता पोन्नावोलू सुधाकर रेड्डी यांनी सांगितले की, येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष न्यायालयाने माजी मुख्यमंत्र्यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे.
दरम्यान, एफआयआर रद्द करण्याची विनंती करणार्या नायडू यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज दुपारी १.३० वाजता सुनावणी होणार आहे. चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास महामंडळाच्या निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यामुळे सरकारी तिजोरीचे ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. नायडू सध्या राजमहेंद्रवरम मध्यवर्ती कारागृहात आहेत.