|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.08° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 3.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 20 May

29.16°C - 31.86°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.87°C - 31.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

29.04°C - 30.28°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.88°C - 30.36°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.42°C - 30.44°C

overcast clouds
Home » आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य » चंद्राबाबू नायडू यांना अटक

चंद्राबाबू नायडू यांना अटक

नंद्याला, (०९ सप्टेंबर) – गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) शनिवारी आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना नांद्याला येथे अटक केली.माजी मुख्यमंत्र्यांना नंद्याला शहरातील ज्ञानपुरम येथील आरके फंक्शन हॉलमधून सकाळी ६ च्या सुमारास सीआयडीने अटक केली, असे एका अधिकार्‍याने पीटीआयला सांगितले.
सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक, एम धनुंजयडू यांनी नायडू यांना नोटीस बजावली, नोटीसनुसार, आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांना संबंधित आयपीसी कलमांखाली अटक करण्यात आली आहे, ज्यात कलम १२०बी (गुन्हेगारी कट), ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेची डिलिव्हरी करणे) आणि ४६५ (बनावट) या कलमांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश सीआयडीने त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदाही दाखल केला आहे. सीआरपीसी कलम ५० (१) (२) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती.
टीडीपी नेत्याला पकडण्यासाठी शनिवारी पहाटे पोलिस अधिकार्यांचा एक गट त्या भागात आला तेव्हा नांद्यालमध्ये उच्च नाट्य घडले. पक्षानुसार, पोलीस चंद्राबाबूंना ओरवाकल विमानतळावरून विमानाने विजयवाडा येथे घेऊन जातील. ॠ१’आरोपांचे पुरावे’ न दाखवता अटक सुरू करण्यात आल्याने टीडीपी प्रमुखाने त्याच्या अटकेला विरोध केला आणि त्यांनी त्यांना सांगितले की आपण केवळ पुरावे दाखवले तरच सहकार्य करू. चंद्राबाबू नायडू म्हणाले मी कोणताही गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार केला नाही. सीआयडी ने मला कोणतीही योग्य माहिती न देता अटक केली आणि मी त्यांना पुरावे दाखवण्यास सांगितले पण त्यांनी दाखवण्यास नकार दिला आणि माझी भूमिका न घेता एफआरआय मध्ये माझे नाव जोडले, . उच्च रक्तदाब आणि मधुमेह आढळून आल्यानंतर सीआयडीने चंद्राबाबूंना वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. आम्ही जामिनासाठी उच्च न्यायालयात जात आहोत, टीडीपी प्रमुखाच्या कायदेशीर वकिलाने एअएनआय ला सांगितले.

Posted by : | on : 9 Sep 2023
Filed under : आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g