किमान तापमान : 31.61° C
कमाल तापमान : 33.86° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 56 %
वायू वेग : 8.48 Mps
स्थळ : Mumbai, IN
33.86° C
28.39°C - 34.99°C
sky is clear29.11°C - 32.99°C
sky is clear28.86°C - 32.53°C
few clouds28.8°C - 32.44°C
sky is clear27.99°C - 30.19°C
scattered clouds27.44°C - 29.78°C
sky is clearहैद्राबाद, (१८ मार्च) – तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तमिलिसाई यांनी पुद्दुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर पदाचाही राजीनामा दिला आहे. सौंदर्यराजन २०१९ पर्यंत तामिळनाडू भाजपाचे प्रमुख होते. यानंतर त्यांना तेलंगणाचे राज्यपाल बनवण्यात आले.
किरण बेदी यांच्यानंतर तमिलीसाई सौंदर्यराजन यांच्याकडे पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, तमिलिसाई सौंदर्यराजन यावेळी भाजपाच्या तिकिटावर तामिळनाडूमधून निवडणूक लढवू शकतात. डीएमके नेत्या कनिमोझी यांच्या विरोधात भाजपाही त्यांना उमेदवारी देऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. सुंदरराजन यांनी २०१९ ची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर २००९ मध्ये त्या चेन्नई (उत्तर) मतदारसंघातून उमेदवार होत्या. मात्र, येथे त्यांना डीएमकेच्या टीकेएस एलांगोवनकडून पराभव स्वीकारावा लागला.