किमान तापमान : 29.14° C
कमाल तापमान : 30.37° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 67 %
वायू वेग : 4.66 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.37° C
29.94°C - 33.01°C
sky is clear28.93°C - 32.9°C
sky is clear28.76°C - 32.34°C
sky is clear27.89°C - 30.45°C
few clouds27.53°C - 29.91°C
sky is clear27.37°C - 30.22°C
sky is clearडेहराडून, (०६ फेब्रुवारी) – धामी सरकारचे बहुप्रतिक्षित यूसीसी विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी युसीसी विधेयक २०२४ सभागृहात मांडले. मुख्यमंत्री धामी यांनी यूसीसी विधेयक २०२४ सादर करताच विरोधकांनी इतका गदारोळ केला की सभागृहाचे कामकाज पुढे चालवता आले नाही. गदारोळ लक्षात घेऊन सभापती रितू खंडुरी यांनी विधानसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. मुख्यमंत्री धामी यांनी यूसीसी विधेयक २०२४ सादर करताना सभागृहात वंदे मातरम्च्या घोषणांनी गुंजायला सुरुवात केली. दुसरीकडे विरोधकांनी गदारोळ सुरू केला. यानंतर विधानसभा अध्यक्ष रितू खंडुरी यांनी विधानसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. यासोबतच युसीसी विधेयक वाचण्यासाठी आमदारांना दुपारी २ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता.
तत्पूर्वी, सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षाचे आमदार आपल्या सर्व मागण्या घेऊन सभागृहाबाहेरील पायर्यांवर निदर्शने करताना दिसले. जेव्हा समान नागरी संहिता विधेयक सभागृहात मांडले जाईल, तेव्हा त्यावर चर्चा सुरू करण्यापूर्वी विरोधी आमदारांना यूसीसी विधेयकाचा अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी विरोधी आमदार करत होते. भाजप सरकार संख्याबळाच्या जोरावर सेवा नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोपही सरकारवर केला.