किमान तापमान : 28.7° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 74 %
वायू वेग : 2.01 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
28.15°C - 30.46°C
few clouds27.79°C - 30.46°C
sky is clear27.79°C - 30.02°C
few clouds27.76°C - 30.17°C
sky is clear28°C - 29.92°C
scattered clouds28.13°C - 30.82°C
broken cloudsनवी दिल्ली, (३० नोव्हेंबर) – अमेरिकेच्या न्याय विभागाने भारतीय नागरिकावर केलेल्या गंभीर आरोपावर भारताने उत्तर दिले आहे. भारताचा नागरिकाचा हत्येच्या एका कटाशी संबंध असल्याचा अमेरिकेने केलेला आरोप अतिशय चिंताजनक आणि भारतीय धोरणांच्या विपरित आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितले.
भारत सरकारचा कर्मचारी असलेला ५२ वर्षीय भारतीय नागरिकाने न्यू यॉर्क शहरातील एका नागरिकाच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप अमेरिकी न्याय विभागाने केला आहे. अमेरिकी न्याय विभागाने खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंग पन्नूच्या बाबतीत हा आरोप केला असला, तरी त्याचे नाव घेतले नाही. पन्नूचे वास्तव्य न्यू यॉर्कमध्येच आहे. आरोप केलेल्या भारतीय नागरिकाचे नाव निखिल गुप्ता असून, ते सुरक्षा व्यवस्था आणि गुप्तचर सूचना पाहतात. गुप्ता यांनी पन्नूच्या हत्येसाठी एक लाख डॉलर्स दिल्याचा आरोप आहे. यातील १५ हजार डॉलर्सचे अॅडव्हान्स पेमेंट ९ जून रोजी करण्यात आले होते. मात्र, ज्या व्यक्तीला हत्येची जबाबदारी देण्यात आली, तो अमेरिकी गुप्तचर यंत्रणेचा एजंट होता. द्विपक्षीय सुरक्षा सहकार्यावरील चर्चेदरम्यान अमेरिकेने आम्हाला काही माहिती दिली होती. या माहितीत गुन्हेगार, बंदुकधारी, दहशतवादी आणि इतरांमधील साटे-लोट्याचा उल्लेख आहे. आम्ही अशी माहिती अतिशय गांभीर्याने घेतो. सोबतच या प्रकरणातील सर्व पैलूंची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. तपास समितीच्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे बागची यांनी सांगितले.