किमान तापमान : 28.82° C
कमाल तापमान : 28.93° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 81 %
वायू वेग : 1.01 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.93° C
28.37°C - 31.75°C
sky is clear28.4°C - 30.71°C
sky is clear28.12°C - 30.5°C
sky is clear28.08°C - 30.23°C
sky is clear27.8°C - 29.92°C
sky is clear27.82°C - 29.94°C
scattered cloudsनवी दिल्ली, (१६ नोव्हेंबर) – बजाज फायनान्सला त्यांच्या दोन कर्ज उत्पादन ई-कॉम आणि इन्स्टा ईएमआय कार्ड अंतर्गत कर्ज मंजूर करणे आणि वितरण त्वरित प्रभावाने थांबवण्याचा निर्देश बुधवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने दिला.
रिझर्व्ह बँकेने याबाबत एक निवेदन जारी करीत म्हटले आहे की, बजाज फायनान्स ई-कॉम आणि इन्स्टा ईएमआय कार्ड या दोन कर्ज उत्पादनांतर्गत, कर्जदारांना मुख्य तथ्य विधाने आणि मुख्य कमतरता जाहीर न करणे या रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल कर्ज मार्गदर्शक तत्त्वांच्या विद्यमान तरतुदींचे पालन करीत नसल्याचे आढळून आले आहे. अशा परिस्थितीत ही कारवाई आवश्यक बनली आहे. कंपनीने मंजूर केलेल्या इतर डिजिटल कर्जांच्या संदर्भात तथ्य विधाने जारी केली आहेत. रिझर्व्ह बँकेच्या समाधानासाठी वरील कमतरता दूर केल्यानंतर या पर्यवेक्षी निर्बंधांचे पुनरावलोकन केले जाईल, असेही बँकेने निवेदनात म्हटले आहे.