|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:16 | सूर्यास्त : 18:21
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.2° C

कमाल तापमान : 27.63° C

तापमान विवरण : light rain

आद्रता : 80 %

वायू वेग : 1.02 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.2° C

Weather Forecast for
Sunday, 22 Sep

26.99°C - 29.02°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 23 Sep

27.07°C - 29°C

light rain
Weather Forecast for
Tuesday, 24 Sep

27.08°C - 28.79°C

moderate rain
Weather Forecast for
Wednesday, 25 Sep

27.1°C - 28.45°C

moderate rain
Weather Forecast for
Thursday, 26 Sep

26.05°C - 28.22°C

light rain
Weather Forecast for
Friday, 27 Sep

24.37°C - 25.8°C

moderate rain
Home » राजकीय, राष्ट्रीय » लोकसभेत रालोआला मिळणार ३१८ जागा; भाजपाला स्पष्ट बहुमत

लोकसभेत रालोआला मिळणार ३१८ जागा; भाजपाला स्पष्ट बहुमत

पुन्हा स्पष्ट बहुमताने साधणार सत्तेची ‘हॅट्ट्रिक’,
– ताज्या सर्वेक्षणातील निष्कर्ष,
नवी दिल्ली, (०१ ऑगस्ट) – पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ अशी नवीन आघाडी तयार केली. मात्र, या आघाडीला निवडणुकीत फार चमकदार कामगिरी दाखविता येणार नसल्याचे एका ताज्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. पंतप्रधान मोदी यांची जादू कायम राहणार असून, या निवडणुकीत भाजपाप्रणीत रालोआला ३१८ किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचे यात दिसून आले आहे.
इंडिया टीव्ही-सीएनएक्स या संस्थेच्या पाहणीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ५४३ पैकी ३१८ जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी ‘इंडिया’ला १७५ जागा मिळू शकतात आणि प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांसह इतर पक्षांना ५० जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
भाजपाच्या जागा कमी होणार
२०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निवडणूक भाजपाने मित्रपक्षांसोबत लढवली असली तरी, भाजपाला या दोन्ही निवडणुकांमध्ये स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळाले होते. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा भाजपाने स्बळावर जिंकल्या होत्या. या निवडणुकीतही भाजपा स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळविण्याच्या स्थितीत राहणार असल्याचे सर्वेक्षणात दिसत आहे. तथापि, भाजपाच्या जागा कमी होऊ शकतात. या निवडणुकीत भाजपा स्वबळावर २९० जागा जिंकण्याच्या स्थितीत राहणार आहे. दुसरीकडे, ५२ जागा असलेल्या प्रमुख विरोधी पक्ष काँग‘ेसची यावेळी सं‘या ६६ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
इंडिया टीव्ही-सीएनएक्सचे हे सर्वेक्षण देशभरातील ४४,५४८ प्रभावशाली मतदारांकडून त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर मिळालेल्या मतांवर आधारित आहे. सर्वेक्षणात समाविष्ट एकूण मतदारांपैकी २३,८७१ पुरुष आणि २०,६७७ महिलांनी मत दिले आहे. दिल्लीतील लोकसभेच्या सातपैकी भाजपाला पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, उत्तरप्रदेशातील ८० पैकी ७३ तसेच गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील सर्वच्या सर्व जागा भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा येथील बहुतांश जागा भाजपाला जाण्याची शक्यता आहे.

Posted by : | on : 1 Aug 2023
Filed under : राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g