Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » परराज्यातील गोमांस बाळगण्याला हायकोर्टाची परवानगी

परराज्यातील गोमांस बाळगण्याला हायकोर्टाची परवानगी

mumbai-high-courtमुंबई, [६ मे] – परराज्यातून महाराष्ट्रात येणार्‍या गोवंश मांस (बीफ) विक्रीला मुंबई उच्च न्यायालयाने आज शुक्रवारी परवानगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्याचबरोबर बाहेर राज्यातून येणारे गोवंश मांस बाळगताही येणार आहे, तसेच ते खाण्यासही कोणतीही बंदी घातलेली नाही. मात्र, त्याचवेळी राज्यात लागू असलेली गोवंश हत्याबंदी कायम राहणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला होता. या कायद्यानुसार गोवंश हत्या, गोमांस विक्री, गोमांस बाळगणे आणि त्याचे सेवन करणे या सर्वांवर बंदी घातली होती. या कायद्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. प्रत्येक व्यक्तिला आपल्या आवडीचे अन्न, मासांहार करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. सरकारने त्यावर बंदी आणून नागरिकांचा मूलभूत हक्क हिरावला आहे, अशा आशयाची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने हे निर्देश दिले आहेत. या याचिकेवरील सुनावणीवेळी परराज्यांतून गोमांस आणून ते महाराष्ट्रात बाळगण्याला उच्च न्यायालयाने परवानगी दिली. दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28202

Posted by on May 6 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (362 of 2449 articles)


मुंबई, [६ मे] - महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटळ्याबाबत सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते छगन भुजबळ यांचे सीए सुनील नाईक ...

×