|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.64° C

कमाल तापमान : 29.54° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 5.22 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.54° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.51°C - 32.02°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.87°C - 32.93°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29°C - 32.52°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.78°C - 32.42°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

27.84°C - 30.17°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.21°C - 29.62°C

sky is clear

जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांमुळे भारत-कॅनडातील संबंध तणावग्रस्त

जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांमुळे भारत-कॅनडातील संबंध तणावग्रस्त– जयशंकर यांनी स्पष्ट केली आपली भूमिका, नवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष पेनी वोंग यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबद्दल जस्टिन ट्रूडो यांनी नवी दिल्लीवर केलेल्या आरोपांमुळे भारत आणि कॅनडातील अनेक महिन्यांपासून तणावग्रस्त राजनैतिक संबंधांवर चर्चा केली. भारत-ऑस्ट्रेलिया परराष्ट्र मंत्र्यांच्या फ्रेमवर्क संवादानंतर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना जयशंकर म्हणाले, होय, मी आज मंत्री वोंग यांच्याशी याबद्दल बोललो. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे...21 Nov 2023 / No Comment /

राजनाथ सिंह-रिचर्ड मार्ल्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा

राजनाथ सिंह-रिचर्ड मार्ल्स यांच्यात द्विपक्षीय चर्चानवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांच्यामध्ये आज, २० नोव्हेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे द्विपक्षीय बैठक झाली. उभय मंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. संयुक्त सराव, देवाणघेवाण आणि संस्थात्मक संवाद यांच्यासह दोन्ही देशांमधील लष्करांमधल्या सहकार्यामध्ये वाढ होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांमध्ये माहितीची देवाणघेवाण आणि सागरी क्षेत्रामध्ये जागरूकता यासाठी सहकार्य आणखी वाढवण्याचे...21 Nov 2023 / No Comment /

३२ टन मदत सामग्री घेऊन भारतीय हवाई दल पॅलेस्टाईनला रवाना

३२ टन मदत सामग्री घेऊन भारतीय हवाई दल पॅलेस्टाईनला रवानानवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात गाझामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी ३२ टन मदत सामग्री घेऊन भारतीय हवाई दलाचे दुसरे सी१७ विमान रविवारी इजिप्तच्या एल-अरिश विमानतळावर रवाना झाले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गझनला मानवतावादी मदतीसाठी भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदत देत राहू, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. भारतीय हवाई दलाचे दुसरे विमान ३२ टन मदत साहित्य घेऊन इजिप्तच्या एल-अरिश विमानतळाकडे रवाना...19 Nov 2023 / No Comment /

भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण सहकार्याबाबत द्विपक्षीय बैठक

भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण सहकार्याबाबत द्विपक्षीय बैठकनवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सोबतीने भारत-ऑस्ट्रेलिया २+२ मंत्रिस्तरीय संवादाचे सह-अध्यक्षपद भूषवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स १९ ते २० नोव्हेंबर २०२३ दरम्यान भारतात येणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात २० नोव्हेंबर रोजी संरक्षण सहकार्याबाबत द्विपक्षीय बैठक होणार आहे, त्यानंतर २+२ संवाद होईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्यासोबत त्यांचे...19 Nov 2023 / No Comment /

जागतिक साखळी व्यवस्था अधिक लवचिक बनवता येईल

जागतिक साखळी व्यवस्था अधिक लवचिक बनवता येईल– दुसर्‍या व्हॉईस ऑफ ग्लोबल शिखर परिषदेत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, (१८ नोव्हेंबर) – जागतिक पुरवठा साखळ्या अधिक मुक्त, सुरक्षित, विश्वासार्ह, स्थिर आणि न्याय्य होण्यासाठी, ग्लोबल साऊथ मधील देशांनी परस्पर सहकार्य आणि एकत्रित कृती करण्याची गरज असून त्याद्वारे ही साखळी व्यवस्था अधिक लवचिक बनवता येईल,असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज दुसर्‍या...18 Nov 2023 / No Comment /

सिलिकॉन व्हॅलीमधील उद्योजकांशी पीयूष गोयल यांनी साधला संवाद

सिलिकॉन व्हॅलीमधील उद्योजकांशी पीयूष गोयल यांनी साधला संवादनवी दिल्ली, (१७ नोव्हेंबर) – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी त्यांच्या अमेरिका दौर्‍याच्या तिसर्‍या दिवशी सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजक आणि भारतीय वंशाच्या उद्यम भांडवलदारांशी संवाद साधला. या संवादादरम्यान, जगभरातील गुंतवणूकदारांनी भारताला गुंतवणुकीचे उत्तम स्थान बनवण्यासाठी त्यांच्या कल्पना सामायिक करण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थितांना प्रोत्साहित केले. केंद्रीय मंत्री गोयल यांनी यावेळी भारतीय स्टार्टअप कार्यक्षेत्राबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन मांडला. कृत्रिम बुद्धिमतेसारख्या महत्वाच्या आणि...17 Nov 2023 / No Comment /

पॅलेस्टाईनने भारताला केले वाचवण्याचे आवाहन

पॅलेस्टाईनने भारताला केले वाचवण्याचे आवाहननवी दिल्ली, (१६ नोव्हेंबर) – इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात गाझा पट्टीमध्ये आतापर्यंत ११ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, या युद्धात १५ हजारांहून अधिक लोक बेघर आणि विस्थापित झाले आहेत. या युद्धादरम्यान पॅलेस्टाईनच्या नजरा आता भारताकडे लागल्या आहेत. त्यांना वाचवण्यासाठी पॅलेस्टाईनने आता भारताकडे मदतीचे आवाहन केले आहे. त्याच वेळी, पॅलेस्टिनीचे भारतातील राजदूत अदनान अबू अल्हाइजा यांनी पीटीआय न्यूजला सांगितले की, महात्मा...16 Nov 2023 / No Comment /

परराष्ट्र मंत्री जयशंकर जाणार ब्रिटन दौर्‍यावर

परराष्ट्र मंत्री जयशंकर जाणार ब्रिटन दौर्‍यावरनवी दिल्ली, (११ नोव्हेंबर) – परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर ११ ते १५ नोव्हेंबर दरम्यान युनायटेड किंगडमच्या अधिकृत दौर्‍यावर असतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, भारत आणि ब्रिटनमध्ये द्विपक्षीय भागीदारी वाढत आहे. आपल्या दौर्‍यादरम्यान परराष्ट्र मंत्री त्यांचे समकक्ष सर जेम्स क्लीव्हरली यांच्याशी चर्चा करतील आणि इतर अनेक मान्यवरांना भेटतील. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परराष्ट्रमंत्र्यांच्या या दौर्‍यामुळे दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांना नवी चालना मिळेल. भारत आणि ब्रिटनमध्ये उबदार आणि समृद्ध संबंध आहेत. भारत-यूके सर्वसमावेशक धोरणात्मक...12 Nov 2023 / No Comment /

भूकंपग्रस्त नेपाळला मदत सामग्रीची तिसरी खेप

भूकंपग्रस्त नेपाळला मदत सामग्रीची तिसरी खेपनवी दिल्ली, (१० नोव्हेंबर) – भारताने गुरुवारी नेपाळमधील भूकंपग्रस्त लोकांसाठी औषधे आणि इतर मदत सामग्रीची तिसरी खेप पाठवली. मदत साहित्याची पहिली खेप रविवारी पाठवण्यात आली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी ’एक्स’ वर लिहिले, भारतीय वायुसेनेचे तिसरे उड्डाण १२ टन मदत सामग्री घेऊन नेपाळला पोहोचले. मदत सामग्रीची नवीनतम खेप भारतीय वायुसेनेच्या लष्करी मालवाहू विमानाने पाठवली होती. गेल्या शुक्रवारी पश्चिम नेपाळच्या अनेक भागात झालेल्या भूकंपामुळे १५० हून अधिक लोकांना आपला जीव...11 Nov 2023 / No Comment /

भारत-अमेरिका भागीदारी महत्त्वाची: राजनाथ सिंह

भारत-अमेरिका भागीदारी महत्त्वाची: राजनाथ सिंह– भारताची परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रीस्तरीय चर्चा दिल्लीत होणार, नवी दिल्ली, (१० नोव्हेंबर) – भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सातत्याने घट्ट होत आहेत. दोन्ही देशांचे नेते अनेकदा अनेक जागतिक मुद्द्यांवर चर्चा करताना दिसतात. एवढेच नाही तर दोन्ही देशांनी अनेकवेळा जागतिक समस्यांवर सहमतीने सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेत पुन्हा एकदा भारत आणि अमेरिका २+२ संवाद साधणार आहेत. या बैठकीत अनेक जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि भारताची परराष्ट्र...11 Nov 2023 / No Comment /

सौदी अरेबिया आयपीएलमध्ये करणार कोट्यवधीची गुंतवणूक

सौदी अरेबिया आयपीएलमध्ये करणार कोट्यवधीची गुंतवणूकनवी दिल्ली, (०४ नोव्हेंबर) – सौदी अरेबियाची नजर आता फुटबॉल आणि गोल्फनंतर जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खेळावर आहे. सौदी क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सल्लागारांनीही त्यांच्या योजनेबाबत भारत सरकारच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. फुटबॉलनंतर सौदी अरेबियाची नजर आता इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलवर आहे. सौदी अरेबियाला आयपीएलमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करायची आहे. सौदी अरेबियाने याआधीच फुटबॉल आणि गोल्फमध्ये मोठी गुंतवणूक केली असून...4 Nov 2023 / No Comment /

भारत-श्रीलंकेदरम्यान आर्थिक, तंत्रज्ञान सहकार्य करार वाटाघाटी पुन्हा सुरु

भारत-श्रीलंकेदरम्यान आर्थिक, तंत्रज्ञान सहकार्य करार वाटाघाटी पुन्हा सुरुनवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – भारत आणि श्रीलंका यांच्यात ३० ऑक्टोबर २०२३ ते १ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत श्रीलंकेमध्ये कोलंबो येथे आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील (ईटीसीए) वाटाघाटीची बारावी फेरी पार पडली. दोन्ही देशांमध्ये २०१६ ते २०१८ दरम्यान, द्विपक्षीय चर्चेच्या अकरा फेर्‍या झाल्या. त्यानंतर या वाटाघाटी थांबवण्यात आल्या होत्या. श्रीलंकेच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व, वाटाघाटी पथकाचे प्रमुख के जे वीरासिंघे यांनी केले, तर भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व वाणिज्य विभागाचे सहसचिव आणि वाटाघाटी...2 Nov 2023 / No Comment /