|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.5° C

कमाल तापमान : 29.53° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 63 %

वायू वेग : 2.35 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.5° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.51°C - 30.64°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.62°C - 30.93°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.82°C - 31.09°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.3°C - 31.08°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.42°C - 30.7°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.95°C - 30.1°C

sky is clear

भारतावर बोलणाऱ्यांना इतिहास माहीत नाही

भारतावर बोलणाऱ्यांना इतिहास माहीत नाही– एस. जयशंकर यांचे रोखठोक उत्तर, नवी दिल्ली, (१८ मार्च) – केंद्र सरकारने मागील आठवड्यात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्याची अधिसूचना जारी केली. यावर अमेरिकेसह अनेक देशांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर रोखठोक उत्तर देत म्हणाले की, भारतावर बोलणार्यांना आमच्या देशाचा इतिहास माहीत नाही. या कायद्याला फाळणीला जोडून पाहणे महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी यापूर्वी अनेक देशांनी वंश, धर्माच्या नावावर नागरिकत्व दिल्याचे दाखले दिले. अमेरिकेच्या परराष्ट्र...19 Mar 2024 / No Comment /

५० टक्के हिंदू लोकसंख्येच्या देशाशी भारत जुळणार!

५० टक्के हिंदू लोकसंख्येच्या देशाशी भारत जुळणार!मॉरिशस, (०१ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. मॉरिशस आणि भारत यांच्यातील संबंधांचा इतिहास अनेक दशकांपूर्वीचा आहे. मॉरिशसची निम्मी लोकसंख्या हिंदू आहे, त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या दृष्टीनेही मॉरिशस विशेष आहे. दोन्ही नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मॉरिशसच्या अगालेगा बेटावर सहा सामुदायिक विकास प्रकल्पांचे तसेच नवीन हवाई पट्टी आणि सेंट जेम्स जेट्टीचे उद्घाटन केले. त्याच महिन्यात, १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही नेत्यांनी मॉरिशसमध्ये...1 Mar 2024 / No Comment /

भारत मार्ट प्रकल्प चीनला धक्का देणार

भारत मार्ट प्रकल्प चीनला धक्का देणारनवी दिल्ली, (१७ फेब्रुवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच संयुक्त अरब अमिरातीच्या दोन दिवसीय दौर्‍यावर होते. यावेळी, त्यांनी अबू धाबीमध्ये पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करताना, पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्यासमवेत दुबईच्या जेबेल अली फ्री ट्रेड झोनमध्ये ’भारत मार्ट’ची पायाभरणी केली. भारत मार्ट हे एक लाख चौरस जमिनीवर बांधलेले एक व्यापार केंद्र असेल जे भारतीय एमएसएमई कंपन्यांना आंतरराष्ट्रीय खरेदीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ प्रदान करेल. हा प्रकल्प स्वावलंबी...18 Feb 2024 / No Comment /

कतार तुरुंगातील ८ भारतीय माजी नौसैनिकांची सुटका

कतार तुरुंगातील ८ भारतीय माजी नौसैनिकांची सुटकानवी दिल्ली, (१२ फेब्रुवारी) – कतारमधील तुरुंगात बंद असलेल्या आठ माजी भारतीय नौसैनिकांची सुटका करण्यात आली आहे, त्यापैकी सात भारतात परतले आहेत. ही माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत या निर्णयाचे स्वागत करतो. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, कतारमध्ये अटकेत असलेल्या दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणार्‍या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेचे भारत सरकार स्वागत करते. मंत्रालयाने सांगितले की, मुक्त करण्यात आलेल्या आठ भारतीयांपैकी सात जण भारतातून परतले आहेत. या नागरिकांची सुटका...13 Feb 2024 / No Comment /

पर्थमधील हिंदी महासागर परिषदेत जयशंकर सहभागी होणार

पर्थमधील हिंदी महासागर परिषदेत जयशंकर सहभागी होणारनवी दिल्ली, (०८ फेब्रुवारी) – शुक्रवारपासून सुरू होणार्या हिंदी महासागरावरील दोन दिवसीय परिषदेत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर ऑस्ट्रेलियन शहर पर्थला जाणार आहेत. या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला जयशंकर यांच्यासह श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक‘मसिंघे, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग व त्यांचे सिंगापूरचे समकक्ष व्हीव्हीयन बालकृष्णन् संबोधित करणार आहेत. ‘इंडियन ओशन कॉन्फरन्स’ हा प्रदेशातील देशांसाठी एक प्रमुख सल्लागार मंच असून, दरवर्षी परराष्ट्र मंत्रालयाद्वारे इंडिया फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित केला...8 Feb 2024 / No Comment /

भारत जपानसोबत अंतराळ क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक

भारत जपानसोबत अंतराळ क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुमियो किशिदा यांचे यशस्वी चंद्र लॅण्डिंगबद्दल केले अभिनंदन, नवी दिल्ली, (२१ जानेवारी) – भारताची इस्रो जपानी एजन्सी ‘जाक्सा’सोबत अंतराळ संशोधन क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानी समकक्ष फुमियो किशिदा यांचे टोकियोच्या यशस्वी चंद्र लॅण्डिंगबद्दल अभिनंदन करताना म्हटले आहे. जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीद्वारे आयोजित केलेल्या मोहिमेद्वारे चंद्रावर अंतराळ यान उतरवणारा केवळ पाचवा देश होऊन जपानने शनिवारी इतिहास घडवला. झाक्साचे चंद्रावर सुरळीतपणे...22 Jan 2024 / No Comment /

इमॅन्युएल मॅक्राँ प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

इमॅन्युएल मॅक्राँ प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणेनवी दिल्ली, (२१ जानेवारी) – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे राहणार आहेत. इतकेच नव्हे, तर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात फ्रेंच लष्कराची तुकडीही सहभागी होणार आहे. दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक आणि नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बळकट संबंध तयार होत असल्याच्या पृष्ठभूमीवर मॅक्राँ यांना प्रजासत्ताक दिनासाठी निमंत्रण पाठविण्यात आले. मॅकाँ आपल्या दोन दिवसांच्या भारत दौर्‍यात दिल्ली आणि जयपूरला भेट देतील. त्यांच्यासोबत येणार्‍या शिष्टमंडळात काही...21 Jan 2024 / No Comment /

प्राचीन काळापासूनच्या भारतविरोधी भावनांची मालदीवमध्ये ही अभिव्यक्ती

प्राचीन काळापासूनच्या भारतविरोधी भावनांची मालदीवमध्ये ही अभिव्यक्ती– सय्यद तनवीर नसरिन यांचे मत, कोलकाता, (१० जानेवारी) – मालदीवमधील मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर त्याचे सर्वत्र जागतिक पडसाद उमटत आहेत. टिप्पणी करणार्या मंत्र्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर मालदीवमधील भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या माजी संचालक सय्यद तनवीर नसरिन यांनी अधोरेखित केले आहे की, सध्याची परिस्थिती अचानक उद्भवलेली नाही, तर ती बर्याच काळापासून सुरू आहे. प्राचीन काळापासून चालत आलेल्या भारतविरोधी भावनांची ही अभिव्यक्ती आहे आणि...10 Jan 2024 / No Comment /

मोदींवरील टीकेबद्दल भारताने केला मालदीवचा निषेध

मोदींवरील टीकेबद्दल भारताने केला मालदीवचा निषेधनवी दिल्ली, (०८ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मालदीवचे राजदूत इब्राहिम साहिब यांना समन्स बजावला आणि त्यांना खडे बोल सुनावत, मालदीवचा तीव्र निषेध केला. मालदीवचे राजदूत इब्राहिम साहिब परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात आले. स्पष्टीकरण दिल्यानंतर काही वेळातच ते निघून गेले. दरम्यान, मोदी आणि भारताविरुद्ध अपमानास्पद टिप्पणीप्रकरणी मालदीवने तीन मंत्र्यांना निलंबित केले आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीप दौरा केला. तेथील काही फोटो...8 Jan 2024 / No Comment /

मालदीव टुरिझम नव्हे, टेररिझमचाही ‘हॉटस्पॉट’

मालदीव टुरिझम नव्हे, टेररिझमचाही ‘हॉटस्पॉट’नवी दिल्ली, (०८ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अभद्र टिप्पणीनंतर मालदीव अचानक प्रकाशझोतात आला. हा देश केवळ टुरिझम नव्हे तर, टेररिझमचाही हॉटस्पॉट ठरत आहे. इसिस या दहशतवादी संघटनेत मालदीवमधूनच सर्वाधिक भरती झाली आहे. मालदीव हा सुन्नीबहूल देश आहे. हा देश अतिशय कट्टरवादी असून, दहशतवाद्यांच्या विरोधात त्याची मवाळ भूमिका राहते, असे अमेरिकेनेही म्हटले आहे. कधीकाळी बौद्ध धर्मीय असलेला मालदीव वेगाने मुस्लिम देश झाला. गैर-मुस्लिमांना येथे नागरिकत्वही दिले जात नाही. मालदीव...8 Jan 2024 / No Comment /

मालदीवचे उच्चायुक्त इब्राहिम स्पष्टीकरण देण्यासाठी भारतात!

मालदीवचे उच्चायुक्त इब्राहिम स्पष्टीकरण देण्यासाठी भारतात!– सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम, नवी दिल्ली, (०८ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा मालदीववर मोठा परिणाम होताना दिसत आहे. सर्वप्रथम, सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली, त्यानंतर आघाडीच्या भारतीय ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवसाठी फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग रद्द केले आणि आता भारत सरकारने मालदीवच्या उच्चायुक्तांना बोलावले आहे. भारत सरकारने समन्स बजावल्यानंतर मालदीवचे उच्चायुक्त इब्राहिम साहिब भारतीय परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले. स्पष्टीकरण दिल्यानंतर काही वेळातच ते...8 Jan 2024 / No Comment /

भारताच्या कठोर भूमिकेनंतर मालदीव नरमला

भारताच्या कठोर भूमिकेनंतर मालदीव नरमलानवी दिल्ली, (०७ जानेवारी) – मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या अपमानास्पद टिप्पणीच्या मुद्यावर भारताने आक्रमक भूमिका घेतली. मालेतील भारतीय उच्चायुक्तांनी या टीकेवर जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर मालदीवने हात झटकत त्यांचे हे वैयक्तिक मत आहे आणि मालदीव सरकार त्यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करीत नाही, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौर्‍याची छायाचित्रे एक्सवर शेअर केली होती आणि भारतीयांनी लक्षद्वीप येथे पर्यटनासाठी जावे, असे आवाहन...7 Jan 2024 / No Comment /