किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (०८ फेब्रुवारी) – शुक्रवारपासून सुरू होणार्या हिंदी महासागरावरील दोन दिवसीय परिषदेत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर ऑस्ट्रेलियन शहर पर्थला जाणार आहेत.
या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला जयशंकर यांच्यासह श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक‘मसिंघे, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग व त्यांचे सिंगापूरचे समकक्ष व्हीव्हीयन बालकृष्णन् संबोधित करणार आहेत. ‘इंडियन ओशन कॉन्फरन्स’ हा प्रदेशातील देशांसाठी एक प्रमुख सल्लागार मंच असून, दरवर्षी परराष्ट्र मंत्रालयाद्वारे इंडिया फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित केला जातो.
परिषदेची सातवी आवृत्ती ऑस्ट्रेलियन सरकारच्या परराष्ट्र व्यवहार व व्यापार विभाग व सिंगापूरच्या एस. राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज आणि पर्थ-यूएस एशिया सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० फेब‘ुवारी रोजी पर्थ येथे आयोजित करण्यात आली आहे. ‘स्थिर आणि शाश्वत हिंदी महासागराच्या दिशेने’ अशी यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे.
या परिषदेत २२ हून अधिक देशांचे मंत्री आणि १६ देश व सहा बहुपक्षीय संघटनांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ एकत्र आणले जाईल, असे एका निवेदनात म्हटले आहे. परिषदेत सुमारे ४० देशांतील ४०० हून अधिक सामाजिक आणि कॉर्पोरेट नेते, धोरण अभ्यासक, विद्वान, व्यावसायिक आणि माध्यम कर्मचारी सहभागी होतील, असे त्यात म्हटले आहे.