किमान तापमान : 28.58° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 37 %
वायू वेग : 3.2 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
25.84°से. - 30.87°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर घनघोर बादल27.21°से. - 30.97°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
रविवार, 17 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (०८ फेब्रुवारी) – तेलुगू देसम् पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. येत्या निवडणुकीसाठी हे दोन्ही पक्ष आंध्र प्रदेशात हातमिळवणी करणार असल्याची चर्चा त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सोबतच होण्याची शक्यता आहे. चंद्राबाबू नायडू यांनी अमित शाह यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीसाठी जे. पी. नड्डाही उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. चंद्राबाबू नायडू रालोआत परतल्यास असे करणारे ते प्रादेशिक पक्षाचे दुसरे नेते असतील. यापूर्वी जदयूचे प्रमुख आणि बिहारचे मु‘यमंत्री नितीशकुमार रालोआत परत आले होते.
भाजपासोबत हात मिळवण्यास चंद्राबाबू नायडू उत्सुक आहेत आणि वायएसआर काँग‘ेस शासित राज्यात नायडू यांची मदत मिळू शकते, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांना असल्याची माहिती सूत्रांनी दिली.