किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.79°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– एस. जयशंकर यांचे रोखठोक उत्तर,
नवी दिल्ली, (१८ मार्च) – केंद्र सरकारने मागील आठवड्यात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्याची अधिसूचना जारी केली. यावर अमेरिकेसह अनेक देशांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर रोखठोक उत्तर देत म्हणाले की, भारतावर बोलणार्यांना आमच्या देशाचा इतिहास माहीत नाही. या कायद्याला फाळणीला जोडून पाहणे महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी यापूर्वी अनेक देशांनी वंश, धर्माच्या नावावर नागरिकत्व दिल्याचे दाखले दिले.
अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सीएएवर बोलताना म्हटले होते की, आम्ही अधिसूचनेबद्दल चिंतेत आहोत. कायद्याची अंमलबजावणी कशी होईल यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत यावर बोलताना जयशंकर म्हणाले, आम्ही त्यांच्या लोकशाहीतील त्रुटी किंवा त्यांची तत्त्वे व कमतरता यावर कधीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. आपल्या इतिहासाबद्दल त्यांनी केलेल्या आकलनावर आमचा आक्षेप आहे. धर्माच्या नावावर देशाची फाळणी झाली. ज्या लोकांचा छळ होत आहे, अशा पीडितांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आणला आहे.
जयशंकर म्हणाले, सीएए कायद्यामुळे देशातील कुणाचेही नागरिकत्व हिरावले जाणार नाही. काही देश अशा प्रतिकि‘या देत आहेत, जशी भारताची फाळणी झालीच नाही. जगात असे काही गट आहे, जे इतिहास समजून न घेता त्याला राजकीय रंग देतात. नंतर हेच लोक असे दाखवण्याचा प्रयत्न करतात की, आम्ही सिद्धांतवादी आहोत आणि तुम्ही नाही. त्यामुळे एखाद्या समस्येबद्दल बोलताना त्याच्याशी संबंधित सर्व ऐतिहासिक संदर्भ पाहणे महत्त्वाचे असते. देश, वंश, धर्म व सामजिक वैशिष्ट्यांच्या आधारावर नागरिकत्व दिल्याची अनेक उदाहरणे आमच्याकडे आहेत. भारतीय राज्यघटना सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याची हमी देते. अल्पसं‘यकांबद्दल कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही.