किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (२१ जानेवारी) – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे राहणार आहेत. इतकेच नव्हे, तर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात फ्रेंच लष्कराची तुकडीही सहभागी होणार आहे.
दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक आणि नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बळकट संबंध तयार होत असल्याच्या पृष्ठभूमीवर मॅक्राँ यांना प्रजासत्ताक दिनासाठी निमंत्रण पाठविण्यात आले. मॅकाँ आपल्या दोन दिवसांच्या भारत दौर्यात दिल्ली आणि जयपूरला भेट देतील. त्यांच्यासोबत येणार्या शिष्टमंडळात काही मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश राहणार आहे.
इमॅन्युएल मॅक्राँ यांचे २५ जानेवारी रोजी जयपूर येथे आमगन होणार आहे. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक रोडशो नियोजित आहे. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार असून, यात संरक्षण आणि धोरणात्मक क्षेत्रातील मोठ्या घोषणा केल्या जाण्याची अपेक्षा आहे. भारत आणि फ्रान्सने तिसर्या देशांच्या फायद्यासह प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाच्या सहविकास आणि सहउत्पादनात सहकार्य करण्याची वचनबद्धताही व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या सुरुवातीला १४ जुलै रोजी पॅरिसमधील बॅस्टिल डे परेडमध्ये सन्माननीय अतिथी होते.